नवी दिल्ली : ड्रग्स सप्लायरला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रग्स सप्लायर धर्मवीर पल्ला याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर त्याच्या मानसांनी हल्ला केला. आज तक या वृत्तवाहिनिने याबाबत वृत्त प्रकाशीत केले आहे. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी इंद्रपुरी परिसरात गेले होते. याचवेळी काही गुंडांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी देखील आपल्या संरक्षणासाठी गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार दोन जणांना गोळी लागली आहे. तर या घटनेत चार पोलीस जखमी झाले आहेत.
ड्रग्स सप्लायर असलेल्या धर्मवीर पल्ला याच्याविरोधात पोलिसांनी अटक वॉरंट काढले होते. त्याला पकडण्यासाठी सकाळी साडेआठच्या दरम्यान पोलीस इंद्रपुरीमधील त्याच्या घरी पोहोचले. मात्र तो घरात आढळून आला नाही. जेव्हा पोलीस त्याच्या घराच्या बाहेर पडले तेव्हा पन्नास ते साठ लोकांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. जमावाने पोलिसांवर दगडफेक देखील केली. त्यानंतर पोलिसांनी देखील गोळीबार केला. या घटनेत दोन जणांना गोळी लागली असून, चार पोलीस जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे अमित आणि सोहेब असल्याचे समोर येत आहे. अमित हा धर्मवीर पल्ला याचा नातेवाईक आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील चोरी, दरोडेखोरी, हत्या प्रकरणात सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत जे जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात जे जखमी झाले आहेत, त्यांच्या घरच्यांनी पोलिसांवरच मारहाणीचा आरोप केला आहे. पोलिसांनी बळजबरी घरात घुसून मारहाण केल्याचे जखमींच्या कुटूंबीयांनी म्हटले आहे.
CCTV | निवांतपणे चालत होता, अचानक सळी कोसळली, डोक्यात घुसली, पुढचं सगळंच सुन्न करणारं..
अंबरनाथमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले; मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीला अटक
समीर वानखेडे यांचा गोव्यात कारवाईचा धडाका, एनसीबीकडून दोन महिलांना अटक