भोपाळ : कोरोनाच्या संकटानंतर आता एक नवच संकट उभं राहिलं आहे. कोरोनानंतर हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरुणांपासून ते बुजुर्गांपर्यंत कुणालाही हार्ट अटॅक येताना दिसत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. भोपाळमध्येही असाच प्रकार आढळून आला आहे. पोस्टल डिपार्टमेंटच्या असिस्टंट डायरेक्टरला डान्स करता करता हार्ट अटॅकचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
16 मार्च रोजीचं हे प्रकरण आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टल डिपार्टमेंटने ऑल इंडिया पोस्टल हॉकी टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. 13 ते 17 मार्च दरम्यान हे आयोजन करण्यात आलं होतं. भोपाळच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ही टुर्नामेंट होत होती. 17 मार्च रोजी या टुर्नामेंटची फायनल होणार होती.
17 मार्चला ही टुर्नामेंटची फायनल होणार होती. त्यानिमित्ताने 16 मार्च रोजी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भोपाळ पोस्ट ऑफिस परिमंडळातील असिस्टंट डायरेक्टर सुरेंद्र कुमार दीक्षित हे आपल्या सहकाऱ्यांसोबत ताल धरला. आपका क्या होगा जनाबे अली… आणि यम्मा यम्मा…. यम्मा यम्मा… ये खूबसूरत समा या गाण्यावर सुरेंद्र कुमार दीक्षित यांनी जोरदार डान्स केला.
अत्यंत प्रसन्न मुद्रेने सुरेंद्र कुमार डान्स करत होते. इतक्यात त्यांचा श्वास थांबला. छातीत एक कळ उमटली. अचानक हार्ट अटॅक आल्याने डान्स करता करता सुरेंद्र कुमार जागेवरच कोसळले. सुरेंद्र कुमार कोसळल्याबरोबर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पटकन उचललं. तोपर्यंत त्यांचे श्वास थांबले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सुरेंद्र कुमार हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत डान्स करत होते. त्यावेळी त्यांचे काही सहकारी व्हिडीओ शुटिंग करत होते. सुरेंद्र कुमार यांना अटॅक आल्यानंतर ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली. आपका क्या होगा जनाबे आली… या गाण्यावर नाचता नाचतात ते कोसळताना या व्हिडीओत दिसत आहे. जेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उचलले तेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं.