13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळली, बचावलेल्या महिलेने सांगितली अपघाताची सत्यता
13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळली. पण इतक्या उंचीवरून पडलेली महिला त्या अपघातातून बजावली आहे. त्या महिलेचे नाव जॉर्डन हॅटमेकर आहे. जॉर्डन मूळच्या व्हर्जिनियाचा असून त्या स्कायडायव्हर आहेत.
नवी दिल्ली – 13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळली. पण इतक्या उंचीवरून पडलेली महिला त्या अपघातातून बजावली आहे. त्या महिलेचे नाव जॉर्डन हॅटमेकर (Jordan Hatmaker) आहे. जॉर्डन मूळच्या व्हर्जिनियाचा (Virginia) असून त्या स्कायडायव्हर (Skydiver) आहेत. ‘द सन’च्या बातमीनुसार अपघाताममध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा अपघात हा निव्वळ तीस सेकंदात घडला होता. पुन्हा त्या स्कायडायव्हिंगसाठी सज्ज झाल्या आहेत. अपघात घडणार याची त्यांना जाणीव झाली होती. परंतु त्यांच्याकडे पर्याय नव्हता. तसेच त्या यातून बचावतील असंही त्यांना वाटलं नव्हतं. परंतु चमत्कार झाला अन् त्या अपघातातून बजावल्या.
नेमकं काय झालं
जॉर्डन हॅटमेकर यांना पॅराशूट उघडायचे होते. नेमकं त्याचवेळी त्याच्या पायात पॅराशूट अडकले. पॅराशूट उघडण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्या 13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने जमीनीवर आदळल्या. पडल्यानंतर त्या जखमेच्या वेदनेने ओरडत होत्या. त्यावेळी त्यांना आता आपण जगणार नाही असं वाटतं होतं. पण चमत्कार झाला आणि त्या पुन्हा स्कायडायव्हिंगसाठी सज्ज झाल्या आहेत.
इतक्या उंचीवरून पडून देखील त्या शुध्दीत होत्या
त्या जमिनीवर पडताच त्याचा पाय तुटला, घोट्यालाही इजा झाली. त्यांच्या पाठीचा कणाही तुटला होता. त्यांच्या शरिराचा एखादा भाग खराब झाला नसेल, नाहीतर संपुर्ण शरीराची चाळण झाली होती. या अपघातानंतर जॉर्डन जवळपास 25 दिवस रुग्णालयातच होत्या. त्यांना पुन्हा आपल्या पायावर चालण्यासाठी तीन महिने लागले. सध्या ती बरी आहे आणि पूर्ण बरी होण्याची वाट पाहत आहे. जॉर्डन म्हणते स्कायडायव्हिंग हे तिचे स्वप्न आहे आणि ती सोडू शकत नाही. लवकरच तिला पुन्हा आकाशातून उडी मारायची आहे.