‘बच्चा! तुझं नशीब बदलणार, फक्त मागे वळून बघू नकोस…हॉटेलमधून बाहेर निघताच कांड
हॉटेलमधून बाहेर निघालो. त्यावेळी साधुच्या वेशात मला चार लोक भेटले. त्यांच्या शरीरावर राख होती. पायाला घंटा बांधलेल्या होत्या. ते माझ्याजवळ आले.

दिल्लीच्या IGI एअरपोर्टवर पोलिसांनी चार शातिर आणि बनावट साधुंना अटक केलीय. साधूच्या वेशात आलेले हे चोर एका व्यक्तीला चांगल्या नशिबाच स्वप्न दाखवून त्याची सोन्याची अंगठी घेऊन फरार झाले. पोलिसांनी या साधूंना अटक करुन त्यांच्याकडून सोन्याची अंगठी जप्त केली. DCP एअरपोर्टनुसार हे प्रकरण 23 मार्च 2025 च आहे. IGI एअरपोर्टवरुन पोलिसांना एक PCR कॉल आलेला. एअरोसिटी JW मॅरियट हॉटेलजवळ चार लोकांनी साधुच्या वेशात एका व्यक्तीला फसवल्याचे कॉलरने सांगितलं. कॉलरने स्वत:च नाव गगन जैन असल्याच सांगितलं.
मी ग्वालियरचा राहणारा असून पेशाने चार्टर्ड अकाऊंटट असल्याच पीडित व्यक्तीने सांगितलं. 23 मार्चला सकाळी 11.30 वाजता चेकआऊट करुन हॉटेलमधून बाहेर निघालो. त्यावेळी साधुच्या वेशात मला चार लोक भेटले. त्यांच्या शरीरावर राख होती. पायाला घंटा बांधलेल्या होत्या. ते माझ्याजवळ आले. आपण हरिद्वाराच्या अखाड्याचे महंत असल्याच सांगून माझा विश्वास संपादन केला.
मागे वळून बघू नको
आरोपींनी आधी गगनला धार्मिक आणि श्रद्धेने टिळक लावला. गंगा मैया आणि महादेवाच नाव घेतलं. मग 2 रुपये मागण्याच्या बहाण्याने 50 रुपये घेतले. त्याची सोन्याची अंगठी दोषपूर्ण असल्याच सांगून त्याच्याकडून मागून घेतली. पीडित आपल्या बोलण्यात फसतोय हे लक्षात आल्यानंतर साधुंनी गगनला ‘बच्चा’ बोलून घाबरवलं. सोन्याची अंगठी दिल्यास भाग्य बदलेल असं त्याला सांगितलं. भितीपोटी गगनने अंगठी दिली. त्यानंतर बनावट साधुंनी त्याला मागे वळून बघू नको असं त्याला सांगितलं. त्यानंतर ते तिथून पसार झाले. गगनला काही समजायच्या आता, चारही साधू तिथून पसार झाले. फसवणूक झाल्याच लक्षात येताच त्याने पोलिसांना फोन लावला.
CCTV फुटेज तपासलं
पीडित व्यक्तीची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस लगेच सक्रीय झाल्याच DCP ने सांगितलं. पोलीस पीडित व्यक्तीला घेऊन त्या ठिकाणी गेले, जिथे ठगांनी त्याला फसवलेलं. लोकांची चौकशी केली. CCTV फुटेज तपासलं. अखेरीस आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने रिंकू नाथ, साहिल नाथ, रॉकी नाथ आणि विक्की नाथ या चौघांना महिपालपूर येथून अटक केली.