अलिशान गाड्यांमध्ये फिरायचा अतिक अहमद, या महागड्या गाड्यांचा होता मालक

अतिक अहमद 8 कोटींची कार चालवायचा. आलिशान वाहनांमध्ये फिरणे त्याला आवडायचे. त्याच्याकडे लँड क्रूझर, मर्सिडीज अशा अनेक एसयूव्ही गाड्या होत्या.

अलिशान गाड्यांमध्ये फिरायचा अतिक अहमद, या महागड्या गाड्यांचा होता मालक
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 1:51 PM

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. अतिक आणि अश्रफ ( atiq and ashraf ahmed ) यांना प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. हल्लेखोरांनी जेव्हा गोळीबार केला तेव्हा मीडियावाले दोघांची चौकशी करत होते. अतिक अहमद यांच्या डोक्यात गोळी लागली आणि तो जागीच ठार झाला. पोलिसांचे म्हणणे आहे की, हल्लेखोर पत्रकार बनून आले होते. अतिक अहमद यांच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशमध्ये जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात पोलिसांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi ) यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. हत्या करणारे कोण होते हे अजून पुढे आलेलं नाही.

आलिशान गाड्यांची आवड

अतिक अहमद याची या भागात मोठी दहशत होती. त्याला आलिशान गाड्यांमध्ये फिरायला आवडायचे आणि त्याने आपल्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्या ठेवल्या होत्या. अतिककडे लँड क्रूझर, मर्सिडीज अशा महागड्या गाड्या होत्या. याशिवाय त्याच्या हमर कार होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अतिकने कानपूरमध्ये या कारचा जोरदार फडशा पाडला होता. त्याचा या गाडीचा नंबर 786 होता.

अतीकला रॉबिनहूड प्रमाणे राहायला आवडायचे. त्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि आलिशान वाहनांची खूप आवड होती असेही सांगितले जाते. देशात विकली जाणारी महागडी आलिशान वाहने अतीकच्या ताफ्यात अनेकदा दिसायची. अनेक वेळा तो या महागड्या वाहनांवर स्वार होताना दिसला, तर अनेक वेळा तो ड्रायव्हिंग सीटवरही दिसला.

अतिकच्या नावावर फक्त ५ कार होत्या. यामध्ये 1991 मॉडेल टोयोटा लँड क्रूझर, 1990 मॉडेल मारुती जिप्सी, 1993 मॉडेल महिंद्रा जीप, 1993 मॉडेल पियाजिओ जीप आणि 2012 मॉडेल पजेरो कार यांचा समावेश होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी गेल्या महिन्यातच त्याच्या काही आलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. काही गाड्या त्याच्या नावावर नव्हत्या. पण त्याच्या ताफ्यात अनेक गाड्यांचा समावेश होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.