Raigad : हरिहरेश्वरमधील संशयित बोटीवरील बॉक्स एटीएसकडून जप्त

संशयित बोटीवरील बॉक्स ज्यामध्ये शस्त्रसाठा आढळून आला होता तो एटीएसकडून जप्त करण्यात आला आहे. ही बोट नेमकी कोणत्या ठिकाणावरून आली? कशी आली याचा शोध घेण्यात येत आहे.

Raigad : हरिहरेश्वरमधील संशयित बोटीवरील बॉक्स एटीएसकडून जप्त
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 7:29 AM

रायगडच्या (Raigad) हरिहरेश्वेर समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी एक संशयित बोट आढळून आली होती. या बोटीमध्ये शस्त्रसाठा आढळून आला होता. या शस्त्रांमध्ये एके 47 चा (AK 47) समावेश होता. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या संशयित बोटीवरील बॉक्स ज्यामध्ये शस्त्रसाठा आढळून आला होता तो एटीएसकडून (ATS) जप्त करण्यात आला आहे. ही बोट नेमकी कोणत्या ठिकाणावरून आली? कशी आली याचा शोध घेण्यात येत आहे. या संशयास्पद बोटीच्या सर्व खातरजमा तपासण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच फॉरेन्सिक लॅबचं पथक देखील घटनास्थळी दाखल होणार आहे. दरम्यान दुसरीकडे हरिहरेश्वर किनाऱ्यावर अशी संशयास्पद बोट आढळून आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. रायगड, पणे आणि मुंबईमधील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिसांकडून वाहनांची तपासणी देखील सुरू होती.

बोट ओमानची असल्याची माहिती

हरिहरेश्वरमध्ये गुरुवारी एक संशयास्पद बोट आढळून आली होती. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल्स आणि जिवंत काडतुसं आढळून आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. ऐन सणोत्सवाच्या काळात ही बोट आढळून आल्याने पोलीस सतर्क झाले. मुंबईसह पुणे आणि रायगडच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. दरम्यान हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सापडलेली ही बोट ओमानची असल्याची माहिती समोर येत आहे. जूनमध्ये ओमानच्या समुद्र किनाऱ्यावरून काही बोटी भरकटल्या होत्या त्यातील एक बोट हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत नेपच्युन मेरिटाईम सिक्युरिटी या कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल्ससह जिवंत काडतूसे आढळून आली आहेत.

हे सुद्धा वाचा

फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी

या संशयास्पद बोटप्रकरणात सध्यातरी कोणताही दहशतवादी अँगल समोर आला नसल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र सध्या सणासुदीचा काळ असल्याने कोणतीही शक्यता नाकारतला येत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात  संशयित बोटीवरील बॉक्स ज्यामध्ये शस्त्रसाठा आढळून आला होता तो एटीएसकडून जप्त करण्यात आला आहे. तसेच बोटीच्या अधिक तपासासाठी लवकरच फॉरेन्सिक लॅबचं पथक देखील घटनास्थळी दाखल होणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.