इंदापूरच्या तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने हल्ला करत मिरचीची पूडही टाकली

Attack on Tehsildar: इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या शासकीय गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्यांच्यावर मिरचीची पूडही टाकली गेली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरु केला आहे.

इंदापूरच्या तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने हल्ला करत मिरचीची पूडही टाकली
इंदापूर तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 7:22 AM

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या शासकीय गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्यांच्यावर मिरचीची पूडही टाकली गेली आहे. या हल्ल्यात श्रीकांत पाटील बचावले आहे. या घटनेनंतर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आलेले आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या सात तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

मिरचीची पूड डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न

इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी संविधान चौकात हा हल्ला केला. शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदारांची गाडी आली असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. सोबत हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती. ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तहसीलदार श्रीकांत पाटील यांचमया गाडीच्या काचा फुटल्या. सुदैवाने तहसीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आलेले आहे.

इंदापूर तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला

सुप्रिया सुळे यांची गृहविभागावर टीका

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही.

हे सुद्धा वाचा

इंदापूर तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला

शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे, हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसांना चिरडणारे आपल्या विभागाच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.