नाशिकः स्त्री शिक्षणासाठी झटणारे महात्मा फुले म्हणत, विद्येविना मती गेली. मात्र, इथे विद्या असूनही मती गेल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे चाललो आहोत, याचा सद्सदविवेक बुद्धी जागृत असणाऱ्या व्यक्तीने तरी विचार करण्याची वेळ आली आहे. फक्त महागडे कपडे घातले, ब्रँडेड वस्तूंचा छंद जोपासला आणि नावापुढे भली मोठी शिक्षणाची पदवी असली म्हणजे तो माणूस खऱ्या अर्थाने शिक्षित असेलच, असे नाही. कारण शिक्षण आणि ज्ञान याचा काडीचाही संबंध नाही, हे आपण वारंवार अनुभवले आहे. तसाच एक भीषण प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. चक्क डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी करण्याचा प्रयत्न होणार होता. त्यातही विशेष म्हणजे मुलीचा होणारा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये. यावर आता बोलणार तर काय?
नेमका प्रकार काय?
नाशिकमध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर एका हॉटेलमध्ये आज रविवारी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यातील नववधू ही उच्चशिक्षित डॉक्टर, तर वर हा मर्चंट नेव्हीत काम करतो. मात्र, या लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी होणार असल्याचा तक्रार अर्ज अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे आला. त्यानुसार अनिंसच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय असते कौमार्य चाचणी?
कौमार्य चाचणीची कुप्रथा एका समाजात आहे. लग्नानंतर यात फक्त वधूची कौमार्य याचणी घेतली जाते. यात जातपंचायत आपण दिलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर वर आणि वधूंना झोपायला सांगते. या कपड्यांवर रक्ताचा डाग पडला, तरच ते लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा लग्न अमान्य केले जाते. वधूला मारहाण होते. पालकांना शिक्षा केली जाते. त्यांच्याकडून खूप मोठा आर्थिक दंड वसूल केला जातो. कुटुंबाला वाळीतही टाकले जाते. यावरून अनेकांनी आत्महत्याही केल्या आहेत.
समाजावरील कलंक
कौमार्य चाचणीविरोधात लढा देणारे जातपंचायत मूठमाती अभियानानेच राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले की, आमचा जात पंचायतीविरोधात लढा सुरू आहे. इथल्या कुप्रथा थांबवायच्या आहेत. एक समाज लग्नादिवशी कौमार्य चाचणी घेतो. हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. अहो, खरे तर चारित्र्य आणि कौमार्याचा काहीही संबंध नसतो. केवळ जुनाट प्रथेच्या नावाखाली काहीही सुरू आहे. या अघोरी प्रथा थांबल्या पाहिजेत. त्या समाजावर कलंक आहेत. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Nashik: साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारhttps://t.co/uuaiLJG8bv#Nashik|#SahityaSammelan|#ChiefMinisterUddhavThackeray|#GuardianMinisterChhaganBhujbal|#NovelistVishwasPatil|#LyricistJavedAkhtar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 21, 2021
इतर बातम्याः
Nashik: दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 2 मुले रक्तबंबाळ, उपचार सुरू