Satara : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संजय नेवसे यांची मालकी हक्काची नायगाव येथे जमीन आहे. तेथे प्रदीप चौडिया नावाची व्यक्ती शासनाची मंजूरी न घेता गेल्या आठ महिन्यांपासून उत्खनन करत होती. त्याबाबत नेवसे यांनी तत्कालीन तलाठी मनिषा शिंदे यांच्याकडे तक्रार दिली होती. तसेच त्यांनी शासनाचा कोट्यावधींचा निधी बुडवला जात असल्याचे सांगितलं होतं.
सातारा : आपल्याच शेतात चाललेल्या उत्खननाविरोधात (Excavation) आवाज उठणाऱ्या नायगाव येथील शेतकऱ्याला नैराश्यातून आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागल्याची घटना सातारा येथे घडली आहे. या थरारक घटनेने पोलिसांची चांगलीच भांभेरी उडाली. तर त्यानंतर आत्मदहनाचा प्रयत्न (attempted self-immolation) करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. तर संजय नेवसे असे ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. संजय नेवसे यांनी तत्कालीन तलाठी मनिषा शिंदे यांच्याकडे तक्रार देत आपल्याच हक्काच्या शेतात गैरकृत्य सुरू असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी तत्कालीन तलाठी मनिषा शिंदे यांनी खोटा पंचनामा केला आणि शासनाचा कोट्यावधींच्या महसुलावर (Revenue) पाणी सोडल्याचे म्हटले होते. तर शिंदे यांनी मलई खाल्याचा दावा ही नेवासे यांनी केला होता.
खोटा पंचनामा केला
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संजय नेवसे यांची मालकी हक्काची नायगाव येथे जमीन आहे. तेथे प्रदीप चौडिया नावाची व्यक्ती शासनाची मंजूरी न घेता गेल्या आठ महिन्यांपासून उत्खनन करत होती. त्याबाबत नेवसे यांनी तत्कालीन तलाठी मनिषा शिंदे यांच्याकडे तक्रार दिली होती. तसेच त्यांनी शासनाचा कोट्यावधींचा निधी बुडवला जात असल्याचे सांगितलं होतं. मात्र तलाठी शिंदे यांनी खोटा पंचनामा केला आणि शासनाचा कोट्यावधींच्या महसुलावर पाणी सोडले. त्याकामी प्रदीप चौडिया यांच्याकडून तलाठी शिंदे यांनी मलई खाल्याचा दावा ही नेवासे यांनी केला होता.
नैराश्यातुन आत्मदहन प्रयत्न
तर आता आपल्याच शेतात होत असणाऱ्या गैर कामाची दखल शासन घेत नसल्याच्या नैराश्यातून नेवासे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेने पोलिसांची चांगलीच भांभेरी उडाली. तसेच संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याच्या नैराश्यातुन नेवसे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय.