धक्कादायक! बळजबरीने दारू पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार अन् खुनाचा प्रयत्न

द्वारका जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित सपना (25) (नाव बदलले आहे) ही द्वारका परिसरात कुटुंबासोबत राहते. ती सेल्स गर्ल म्हणून काम करते. ती चांगल्या नोकरीच्या शोधात होती. अलीकडेच अंकित सेहरावाल नावाच्या तरुणाशी तिची भेट झाली आणि सपनाला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

धक्कादायक! बळजबरीने दारू पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार अन् खुनाचा प्रयत्न
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 6:56 PM

नवी दिल्लीः भगवान श्रीकृष्णाची नगरी असलेल्या द्वारकेतीलही गुन्हेगारीचं प्रमाण काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. द्वारकेतल्या दक्षिण परिसरात नोकरीच्या बहाण्याने आलेल्या तरुणीवर जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. तिने या घटनेला विरोध केला असता पीडितेचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न झाला. यानंतर आरोपीने तिच्या तोंडावर लोखंडी रॉडने वार केले. घटनेनंतर आरोपी मुलीला जखमी अवस्थेत हॉटेलमध्ये सोडून पळून गेला.

तिने लाईव्ह लोकेशन पोलिसांसोबत शेअर केले

तरुणीने कशी तरी ही माहिती स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचवली. नंतर तिने लाईव्ह लोकेशन पोलिसांसोबत शेअर केले. यानंतर पोलीस जखमी मुलीपर्यंत पोहोचले. हॉटेलचा दरवाजा तोडून दुसऱ्या मजल्यावरून मुलीची सुटका करण्यात आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. द्वारका दक्षिण पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक संजय कुमार महतो याच्याविरुद्ध बलात्कार, सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, गुन्हेगारी कट रचणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक केलीय. पोलीस मुख्य आरोपी अंकित सेहरावतचा शोध घेत आहेत. हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरूनही पोलीस तपास करत आहेत.

पीडित सपना (25) (नाव बदलले आहे) ही द्वारका परिसरात कुटुंबासोबत राहते

द्वारका जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित सपना (25) (नाव बदलले आहे) ही द्वारका परिसरात कुटुंबासोबत राहते. ती सेल्स गर्ल म्हणून काम करते. ती चांगल्या नोकरीच्या शोधात होती. अलीकडेच अंकित सेहरावाल नावाच्या तरुणाशी तिची भेट झाली आणि सपनाला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. शनिवारी संध्याकाळी आरोपीने सपनाला फोन करून तिला भेटण्यास सांगितले. दोघांची भेट बिकानेर स्वीट्समध्ये झाली.

आरोपीने पीडितेला त्याच्या दुचाकीवर बसवून हॉटेलमध्ये नेले

यानंतर रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडितेला त्याच्या दुचाकीवर बसवून सेक्टर-9 जवळील सिल्व्हर पॅलेस हॉटेलमध्ये नेले. तेथे पीडितेने हॉटेलमध्ये जाण्यास नकार दिला. यानंतर आरोपीने सांगितले की, सर्वजण त्याला हॉटेलमध्ये ओळखतात, त्याची आई स्वत: पोलीस अधिकारी आहे. तो नुकताच हॉटेलमध्ये नोकरीबद्दल बोलण्यासाठी आला आहे. आरोपीने सपनाला दुसऱ्या मजल्यावर नेले. खोली क्रमांक-202 मध्ये पोहोचल्यावर आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली. त्याला विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

इतर लोकांच्या मदतीने तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न

पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने इतर लोकांच्या मदतीने तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. नंतर त्याने पीडित तरुणीवर वार करून रक्तबंबाळ केले. घटनेनंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. सपनाची अवस्था पाहून हॉटेलचे बाकीचे कर्मचारीही तेथून पळून गेले. तेथून निघताना हॉटेलचा दरवाजा बंद करून आरोपी पळून गेले. सपनाने लागलीच पोलिसांना फोन केला. त्यानंतर लोकेशन शेअर केले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सपनाच्या किंकाळ्या ऐकू आल्या, मात्र हॉटेलचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून सपनाला दुसऱ्या मजल्यावरून खाली आणण्यात आले. यानंतर तिला रुग्णालयात पाठवण्यात आले. तपासानंतर रविवारी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचाही हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे त्यात सामूहिक बलात्काराची कलमे जोडण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

रेल्वे तिकीट रद्द करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, किती शुल्क कापले जाणार?

किरकोळ गुंतवणूकदारांना गिफ्ट, 12 नोव्हेंबरला पीएम मोदी ‘या’ योजनेचा करणार शुभारंभ

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.