मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याचे चिन्हे दिसत आहेत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खंडणीप्रकरणी देशमुखांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भातखळकर यांनी या तक्रारीत केली आहे. (atul bhatkhalkar lodge complaint against anil deshmukh)
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतून दर महिन्याला 100 कोटी रुपये खंडणी जमा करून देण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री आलेल्या पत्रात दिली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे राज्याच्या गृहमंत्र्यांवर विरोधातच असा दावा करणे हे अतिशय गंभीर प्रकरण असून, या प्रकरणी देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी तक्रारीत केली आहे.
देशमुखांच्या स्वीय सहायकांची चौकशी करा
सिंग यांनी पुराव्यांसह इतके गंभीर आरोप करून दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी उठून गेला असताना सुद्धा राज्य सरकार कडून कोणत्याही प्रकारची चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राचा दुसऱ्या दिवशी देशमुख यांच्याकडून करण्यात आलेल्या खुलासा पत्रात सुद्धा सिंग यांच्या कोणत्याही आरोपांचे खंडन करण्यात आलेले नाही, त्यामुळे सिंग यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात नावे असलेल्या देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे, पोलीस उपायुक्त भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांची चौकशी केल्यास आणखी सत्य समोर येतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
तर उच्च न्यायलयात जाऊ
तसेच यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे या प्रकरणी देशमुखांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे, जर या संदर्भात राज्य सरकारकडून 24 तासांत गुन्हा दाखल न झाल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा भातखळकर दिला आहे.
कांदिवलीतील बारमधील खंडणी वसुलीची चौकशी करा
तसेच या पत्रात समतानगर पोलिस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या बार, रेस्टॉरंट, पब यांच्याकडून किती खंडणी आतापर्यंत वसूल करण्यात आली आहे व ती कोणी वसुली केली, याची सुद्धा सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. (atul bhatkhalkar lodge complaint against anil deshmukh)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 22 March 2021https://t.co/dmhkh0Ca87
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
संबंधित बातम्या:
देशमुखांना वाचवण्यासाठी पवारांकडे पुरावे, त्या पुराव्याविरोधात फडणवीसांचा VIDEO पुरावा
Sharad Pawar | पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवार म्हणाले “इनफ इज इनफ”
अनिल देशमुखांकडे कोणतं गुपित, ज्यामुळे पवारांनी 24 तासांत भूमिका बदलली? भाजप आक्रमक
(atul bhatkhalkar lodge complaint against anil deshmukh)