Atul Subhash Case : छळामुळे नवऱ्याने संपवलं जीवन, कुठे आहे निकिता सिंघानिया? कधी होणार अरेस्ट?

Atul Subhash New Update : बंगळुरु पोलीस जौनपूरला येण्याआधी निशा सिंघानिया तिच्या संपूर्ण कुटुंबासह फरार झाली. ती कुठे आहे, या बद्दल काही माहिती नाहीय. बुधवारी रात्रीच निकिता, तिची आई आणि भाऊ अनुराग घरातून बाहेर निघाताना दिसले होते.

Atul Subhash Case : छळामुळे नवऱ्याने संपवलं जीवन, कुठे आहे निकिता सिंघानिया? कधी होणार अरेस्ट?
atul subhash-nikita singhania
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 12:00 PM

सध्या सगळ्या देशात AI सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण गाजत आहे. बंगळुरु पोलीस या प्रकरणी पत्नी निकिताच्या जौनपूर येथील घरी पोहोचले आहेत. खोआ मंडी येथील निकिताच्या घराबाहेर नोटिस चिकटवली आहे. पोलीस आता निकिताच्या दुसऱ्याघरी रुहट्टा येथे जातील. सध्या निकिता आपल्या कुटुंबासह फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार निकिता सिंघानियां जौनपूर येथील तिच्या घरीच आहे. निकिता तिची आई निशा, भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया कोणाच्यातरी घरी लपले आहेत.

बंगळुरु पोलीस गुरुवारी संध्याकाळी जौनपूर येथे पोहोचले. एक महिला, एक पुरुष, दोन सब इंस्पेक्टरसह चार पोलीस बंगळुरुहून जौनपूरला पोहोचले आहेत. नगर कोतवाली येथे जाऊन त्यांनी जौनपूर पोलिसांची भेट घेतली. मग, कागदपत्रांची पूर्तता केली. बंगळुरु पोलीस रात्र असल्याने निकिताच्या घरी गेले नाहीत. निकिताची दोन घरं आहेत. निकिता, निशा सिंघानिया अनुराग सिंघानिया आणि सुशील सिंघानिया यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येईल. बंगळुरु पोलीस आरोपींची ट्रांजिट रिमांड घेतील. बंगळुरु पोलीस जौनपूरला येण्याआधी निशा सिंघानिया तिच्या संपूर्ण कुटुंबासह फरार झाली. ती कुठे आहे, या बद्दल काही माहिती नाहीय.

कॅमेऱ्यात त्यांचे फोटो कैद

याआधी स्थानिक पोलीस तिला ताब्यात घेण्यासाठी पोहोचले होते. पण तिच्या घराला टाळं होतं. बुधवारी रात्रीच निकिता, तिची आई आणि भाऊ अनुराग घरातून बाहेर निघाताना दिसले होते. कॅमेऱ्यात त्यांचे फोटो कैद झाले.

यांच्या मागण्याच संपत नाहीत

अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी निकिता सिंघानियाची आई, भाऊ आणि काकावर गंभीर आरोप केले होते. व्हिडिओच्या माध्यमातून अतुलने निकितावर त्याच्या विरोधात 9 खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला होता. निकिता आणि तिच्या कुटुंबाला पैसे देऊन थकलोय. यांच्या मागण्याच संपत नाहीत. अखेरीस या त्रासाला कंटाळून अतुलने सोमवारी जीवन संपवलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.