VIDEO | शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी गळफास, चंद्रकांत खैरेंची महिला पोलीस निरीक्षकाशी खडाजंगी

औरंगाबादेतील शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात आत्महत्या केली होती. (Chandrakant Khaire Rajashri Aade)

VIDEO | शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी गळफास, चंद्रकांत खैरेंची महिला पोलीस निरीक्षकाशी खडाजंगी
माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात खडाजंगी
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 8:45 AM

औरंगाबाद : शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. औरंगाबादमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुखांच्या आत्महत्येनंतर जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी चंद्रकांत खैरेंचा आवाज चढला, त्यावर राजश्री आडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Aurangabad former MP Chandrakant Khaire PI Rajashri Aade Verbal Fight after Shivsena Leader Suicide)

शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर हजारोंचा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. यावेळी चंद्रकांत खैरे यांनीही पोलीस निरीक्षकांवर ओरडण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनीही खैरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांत खैरे आणि राजश्री आडे यांच्या खडाजंगीचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये काय ऐकू येतंय?

चंद्रकांत खैरे : माझा कार्यकर्ता गेला.. माझा कार्यकर्ता गेला.. माझ्या कार्यकर्त्याला मारलं… मी फॅक्ट बोलतोय पोलीस निरीक्षक राजश्री आडे : काय फॅक्ट बोलताय? चंद्रकांत खैरे : मी वाचवलं तुम्हाला पोलीस निरीक्षक राजश्री आडे : काय वाचवलं? जमावातून आवाज : बाहेर कुलूप आहे का? पोलीस निरीक्षक राजश्री आडे : मी यांच्यासमोर पंचनामा केला आहे, हे माझे साक्षीदार आहेत, आमच्याकडे सगळे फोटोग्राफ्स आहेत.

पाहा व्हिडीओ :

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे औरंगाबाद उपतालुका प्रमुख आणि दौलताबाद ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली होती. मात्र खजिनदार यांच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुनील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयातून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणला. (Chandrakant Khaire Rajashri Aade)

सुनील खजिनदार यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासाठी शेकडोंच्या जमावाने दौलताबाद पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. या घटनेमुळे दौलताबादेत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील दुकाने, बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

आत्महत्येमागील कारण काय?

सुनील खजिनदार यांनी दौलताबाद येथील मुजीब कॉलनीतील घरात गुरुवारी (18 मार्च) गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील हे एका लोखंडी साखळीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. पोलिसांनी पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली. सुनील यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेना उपतालुका प्रमुखाचा प्रेयसीच्या घरात गळफास, कुटुंबाला हत्येचा संशय

(Aurangabad former MP Chandrakant Khaire PI Rajashri Aade Verbal Fight after Shivsena Leader Suicide)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.