Bank Fraud: बँक मॅनेजर निघाला ‘बडा खिलाडी’, 17 बँक खाती उघडून लांबवले 12.51 कोटी
Bank Fraud: बंगळुरुमधील इंदिरानगरमधील एक्सिस बँकेत वैभव पिथादिया रिलेशिनशिप मॅनेजर होता. तो नियमित बँकेत जात होता. बँकेतील कर्मचाऱ्यांसोबत त्याने चांगले संबंध तयार केले होते. त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही. बँकेत तो काय खेळ खेळत आहे, त्याचा सुगावा कोणाला लागला नाही.
Bank Fraud: बँकींग प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारे प्रकरण बंगळुरुमधून समोर आले आहे. एका बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरने आपल्याच बँकेतील 12.51 कोटी रुपये लांबवले. त्यासाठी त्याने आधी 17 खात्यांचा वापर केला. त्यानंतर ही ड्रीम प्लग पे टेक सॉल्यूशंस प्राइव्हेट लिमिटेड (सीआरईडी) या कंपनीची रक्कम या खात्यांमध्ये वळवली. कंपनीने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. त्यात रिलेशनशिप बँक मॅनेजरच आरोपी निघाला. या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
बँकेतील कोणाला संशय आला नाही?
बंगळुरुमधील इंदिरानगरमधील एक्सिस बँकेत वैभव पिथादिया रिलेशिनशिप मॅनेजर होता. तो नियमित बँकेत जात होता. बँकेतील कर्मचाऱ्यांसोबत त्याने चांगले संबंध तयार केले होते. त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही. बँकेत तो काय खेळ खेळत आहे, त्याचा सुगावा कोणाला लागला नाही. त्याने ड्रीम प्लग पे टेक सॉल्यूशंस प्राइव्हेट लिमिटेड कंपनीच्या करंट खात्यातील 12.51 कोटी रुपये लांबवले. कंपनीला यासंदर्भात माहिती मिळाल्यावर कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यात पोहचले.
पोलिसांच्या तपासात हे निघाले आरोपी
पोलिसांनी एक्सेस बँकेतील अपहाराचा तपास सुरु केला. तेव्हा त्यात वैभव पिथादिया समोर आला. त्याने 17 खाती वापरुन 12.51 कोटी रुपये वर्ग केले. या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी तीन जण निघाले. बँकिंग एजेंट नेहा बेन विपलभाई, इंश्योरन्स एजेंट शैलेश आणि कमीशन एजेंट शुभम यांनी मिळून ड्रीम प्लग पे टेक सॉल्यूशन्स कंपनीचे पैसे लांबवले.
पोलिसांनी सांगितले की, कंपनीचा नोडल आणि चालू बँक खाती एक्सिस बँकेत आहे. काही लोकांनी कंपनीचे ईमेल एड्रेस आणि कॉन्टेक्ट नंबरपर्यंत आपला एक्सेस तयार केला. त्या माध्यमातून कंपनीचा संवेदनशील डेटा चोरला. 29 ऑक्टूबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान कंपनीचे एकूण 12.51 कोटी रुपये त्यांनी आपल्या खात्यांमध्ये वर्ग केले. आरोपींनी ड्रीम प्लग कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करत बोर्ड प्रस्ताव तयार केला. त्यात ईमेल, रजिस्टर्ड मोबाइल नंबर बदलण्याचे म्हटले. त्यानंतर एक्सिस बँककडून ते अप्रूव्ह करण्यात आले.
मोबाईल नंबर बदलताच आरोपींनी ओटीपीच्या माध्यमातून 37 ट्रॉजॅक्शन केले. त्यांनी 15 कोटींचे ट्रॉजॅक्शन करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन युजर आयडी इनॅक्टीव्ह होते. त्यामुळे 12 कोटींचे ट्रॉजॅक्शन झाले. त्यांनी देशभरातून अनेक खात्यातून पैसे काढले आहे. बँकेतून लंबावलेले पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरु आहे.