चेहऱ्यावर अनेक वार, सगळीकडे रक्त…अखेर ट्रेनमध्ये महिला शिपायाबरोबर त्या रात्री काय झालं?

Crime news : महिला शिपायाबरोबर झालं ते धक्कादायक. ट्रेनमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितलं की, महिला शिपायाचे कपडे अस्त-व्यस्त होते. चेहऱ्यावर कोणीतरी धारदार शस्त्राने वार केले होते. या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली असून संबंधितांकडून उत्तर मागितलं आहे.

चेहऱ्यावर अनेक वार, सगळीकडे रक्त...अखेर ट्रेनमध्ये महिला शिपायाबरोबर त्या रात्री काय झालं?
crime news
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 1:21 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात सरयू एक्सप्रेसमध्ये एका महिला शिपायासोबत धक्कादायक घटना घडली. या विषयी आता सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. हा विषय तापू लागलाय. सरयू एक्सप्रेसमध्ये महिला शिपायसोबत जे घडलं, त्यावरुन ट्रेनमधील महिला सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालय. लोकांचा प्रश्न आहे की, जर पोलीसच सुरक्षित नसतील, तर आम्हा सर्वसामान्यांच काय? अलाहाबाद हायकोर्टाने रविवारी रात्री या प्रकरणाची सुनावणी घेतली. हायकोर्टाने सर्व जबाबदार लोकांकडून उत्तर मागितलं आहे. आज सर्वांना कोर्टात हजर राहून उत्तर द्यायच आहे. मागच्या महिन्यातील 30 ऑगस्टचा हा विषय आहे. ही महिला शिपाई प्रयागराज जिल्ह्यामध्ये राहते.

अयोध्येच्या हनुमानगढ़ी मंदिरात नेहमीप्रमाणे पहाटे तीन वाजल्यापासून संध्याकाळी 5.40 पर्यंत तिची ड्युटी लागली होती. 28 ऑगस्टला काही कामानिमित्त ती सुल्तानपूरला आली होती. 29 ऑगस्टच्या संध्याकाळी सरयू एक्सप्रेस पकडून ती पुन्हा ड्युटीच्या ठिकाणी अयोध्येला चालली होती. सरयू एक्सप्रेस प्रयागराजवरुन सुल्तानपूर तिथून अयोध्या आणि मनकापूरपर्यंत जाते. महिला शिपाई ट्रेनमध्ये झोपून गेली. त्यामुळे अयोध्येऐवजी मनकापूरला पोहोचली. ट्रेन सकाळी मनकापूरहून निघाल्यानंतर 4:30 वाजता अयोध्येत पोहोचली. अयोध्येत प्रवाशांनी रिकाम्या बोगीत महिला शिपायाला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं.

ट्रामा सेंटरमध्ये हलवलं

त्यांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिथे येऊन लगेच महिला शिपायाला श्रीराम चिकित्सालयात दाखल केलं. प्रकृती गंभीर असल्याने तिला दर्शन नगर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. तिथेही प्रकृती सुधारली नाही. त्यामुळे तिला लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आलं. तिथे तिचे उपचार सुरु आहेत. ट्रेनमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी काय सांगितलं?

जीआरपी पोलिसांनी अयोध्या जंक्शनवर बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एकाही स्टेशनवर महिला शिपाई उतरताना दिसली नाही. मनकापुर स्टेशनवर तिच्याबरोबर अमानवीय कृत्य झाल्याचा संशय आहे. एसपी जीआरपी पूजा यादव यांनी मनकापुर स्टेशनवर पोहोचून तपास सुरु केलाय. लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये ही महिला शिपाई बेशुद्ध अवस्थेत आहे. ट्रेनमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितलं की, महिला शिपायाचे कपडे अस्त-व्यस्त होते. चेहऱ्यावर कोणीतरी धारदार शस्त्राने वार केले होते. गालावर एक साइडने कटच निशाण आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.