Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासा, पुण्यात कोणाच्या मर्डरच प्लानिंग?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता एक नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींनी पुण्यात एकाची हत्या करण्याच प्लानिंग केल्याच समोर आलं आहे. पोलीस चौकशीतून या बाबी समोर आल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांची हत्या घडवून आणली.

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासा, पुण्यात कोणाच्या मर्डरच प्लानिंग?
Baba SiddiqueImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 8:31 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता एक नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी मक्को कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. त्यातून असं समोर आलय की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तिन्ही आरोपींनी पुण्यातल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचाही खून करायचा होता. त्यांनी प्लानिंगही केलं होतं. पण त्याआधीच बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने हा कट फसला. फरार आरोपी शुभम लोणकरच्या नेतृत्वात आरोपी रुपेश मोहोळ आणि गौरव अपूने यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचं प्लानिंग केलं होतं.

सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या उत्तम नगर परिसरात गुंड जयदीप भोंडकरची अमित गुर्जरने हत्या केली होती. भोंडकरची हत्या करणाऱ्या आरोपी अमित गुर्जरला या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने पूर्ण मदत केल्याचा संशय शुभम लोणकरच्या गँगला होता. हत्या झालेला जयदीप भोंडकर हा शुभम लोणकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा जवळचा मित्र होता. शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करतो. या तीन आरोपींनी जयदीप भोंडकरच्या हत्येचा बदला म्हणून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा कट रचला पण त्याआधीच त्यांना सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक झाली.

कोयत्याने वार करुन हत्या

गुन्हे शाखेने ही माहिती उत्तम नगर पोलिसांना दिली. जेणेकरुन अधिकाऱ्याच्या मुलाला पुरेशी सुरक्षा मिळेल. जयदीप भोंडकरची 7 सप्टेंबरला अमित गुर्जरने कोयत्याने वार करुन हत्या केली होती. दोघे एकमेकांना ओळखायचे. दोघांमध्ये आधी बोलणं सुरु झालं. ते वादावादीमध्ये बदललं आणि त्यानंतर दोघे हिंसक बनले. गुर्जरने मदत हवी म्हणून भोंडकरला त्याच्या घराबाहेर बोलावलं. त्याचवेळी त्याने कोयत्याने वार करुन हत्या केली.

प्लानिंग कशी केली?

रुपेश मोहोळ आणि गौरव अपूला खात्री होती की, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने अमित गुर्जरला फक्त मदतच केली नाही, तर हा सगळा कट रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रुपेश मोहोळ आणि गौरव अपूने चौकशीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. शुभमच्या मदतीने हल्ला करण्यासाठी त्यांनी शस्त्र मिळवलं होतं.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.