baba siddique death: ‘अंकल, अंटी कैसे हो?’, विचारणारे निघाले बाबा सिद्दिकींचे ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’

| Updated on: Oct 15, 2024 | 2:37 PM

baba siddique death: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात चौथा आरोपी मोहम्मद जसिन अख्तर हा पंजाबमधील आहे. तसेच या प्रकरणात महाराष्ट्रातील आरोपी शिबू लोणकर और प्रवीण लोणकर यांची नावे समोर आली आहे. त्यांनी या आरोपींना पैसे पुरवल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

baba siddique death: अंकल, अंटी कैसे हो?, विचारणारे निघाले बाबा सिद्दिकींचे कॉन्ट्रॅक्ट किलर
baba siddique
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. या गँगने या हत्येची सुपारी दिली होती. उत्तर प्रदेशातील असणारे दोघे आणि हरियाणातील असलेल्या एकाने बाबा सिद्दिकी यांची हत्या केली. शिव कुमार गौतम, गुरुमेल सिंग, धर्मराज कश्यप या तिघांनी हत्येची सुपारी घेतली होती. ही हत्या घडवणारे तिघे कुर्ला पोलीस पटेल चाळीत राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी या ठिकाणी खोली भाड्याने घेतली होती. या ठिकाणी आल्यानंतर ते चाळीतील लोकांशी अगदी प्रेमाने वागत होते. चाळीतील रहिवाशांना ते येता जाता विचारत होते, ‘अंकल, अंटी कैसे हो?’…त्यांनीच खून केल्याचा धक्का चाळीतील लोकांना बसला आहे. पोलिसांनी आता त्यांच्या घराला टाळे लावले आहे.

घरासाठी दिले दुप्पट भाडे

कुर्ला पश्चिमेकडील पटेल चाळीतील खोली क्रमांक २२५ मध्ये हे कॉन्ट्रेक्ट किलर राहत होते. घर मालकाला दुप्पट भाडे देऊन दलालामार्फत त्यांनी ही रुम मिळवली. ते सप्टेंबरपासून या ठिकाणी आले. त्यातील गुरुमेल अनेकदा सिगारेट ओढताना दिसत होता. तो इंग्रजीत बोलत होता. ते चाळीतील रहिवाशांना चांगल्या घरातील वाटत होते. आरोपींच्या घराला टाळे लागले आहे. घरात समान अस्ताव्यस्त पडले असल्याचे खिडकीतून दिसत आहे. गाद्या, कपडे घरात आहे. कोल्ड्रिंक्सच्या रिकम्या बाटल्याही पडल्या आहेत. या ठिकाणी मारेकरी राहत असल्याने ते घर पाहण्यासाठी लोकही गर्दी करत आहेत.

घर शोधण्याची जबाबदारी शिवकुमारकडे

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट ठरल्यानंतर शिवकुमार याच्यावर घर शोधण्याची जबाबदारी दिली होती. शिवकुमारने कुर्ला परिसरात दलालाच्या मदतीने घर भाड्याने घेतले. त्यानंतर सप्टेंबर पासून तो राहण्यास आला. त्या पाठोपाठ कश्यप आणि काही दिवशांनी गुरुमेल आला. गुरुमेल सिंग, धर्मराज कश्यप या आरोपींना पोलिसांना सांगितले की, काम होऊ द्या, मोठी रक्कम मिळणार आहे, असे सांगितले होते. त्यासाठी त्यांना बाबा सिद्दिकी यांचा फोटो आणि फ्लेक्स दिला होता.

हे सुद्धा वाचा

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात चौथा आरोपी मोहम्मद जसिन अख्तर हा पंजाबमधील आहे. तसेच या प्रकरणात महाराष्ट्रातील आरोपी शिबू लोणकर और प्रवीण लोणकर यांची नावे समोर आली आहे. त्यांनी या आरोपींना पैसे पुरवल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.