Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकी खून, आरोपीच्या आजीने म्हटले, त्याला भर चौकात गोळ्या घाला
lawrence bishnoi case: बाबा सिद्दिकी यांच्यावर ९.९ एमएमच्या पिस्तुलाने गोळ्या आरोपींनी झाडल्या. आरोपींनी 7 राउंड फायर केले होते. त्यापैकी तीन गोळ्या सिद्दिकी यांना लागल्या आणि एक गोळी सिद्दिकीसोबत असलेल्या व्यक्तीला लागली.
Baba Siddique Shot Dead in Mumbai: मुंबईत राज्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री ९.१५ वाजता हत्या झाली. हत्या करणारे तीन आरोपींपैकी एक हरियाणातील आहे. दुसरे दोघे उत्तर प्रदेशातील आहेत. या आरोपींनी सुपारी घेऊन हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. शिवकुमार गौतम उर्फ शिवा आणि धर्मराज कश्यप हे दोन्ही उत्तर प्रदेशातील आहेत. तर शूटर गुरमेल बलजीत सिंह हरियाणातील आहे. या घटनेची माहिती त्याच्या कैथल जिल्ह्यातील नरड गावात गेली. त्याची आजी फुल्ली देवी यांनी गुरमेल आमच्यासाठी मेला आहे. त्याला भरचौकात गोळ्या घाला, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
गुरमेल गुन्हेगारी प्रवृत्तीचा
2019 मधील एका युवकाच्या हत्या प्रकरणात गुरमेल कारागृहात होता. जामिनावर सुटल्यानंतर त्याने बाबा सिद्दिकी यांची हत्या केली. गावात जेव्हा त्याने हत्या केल्याची बातमी पसरली तेव्हा गावातील लोकांना त्याचे आश्चर्य वाटले नाही. त्यांना गुरमेल याची गुन्हेगारी प्रवृत्ती माहीत होती. आरोपीची आजी फुल्ली देवी म्हणाली, खूप पूर्वी गुरमेल याला आम्ही घरातून काढून टाकले आहे. तो आमच्यासाठी मेला आहे. त्याला चौकात उभे करुन गोळ्या घाला.
फुल्ली देवी पुढे म्हणाल्या की, गुरमेल चार महिन्यांपासून गावात आला नाही. तो कुठे गेला आणि काय करतो हे आम्हाला माहीत नाही. आम्हीही त्याच्याशी संबंध तोडल्यामुळे त्याला कधी विचारणा केली नाही. आमचे त्याच्याशी काहीच नाते नाही.
गुरमेलच्या आई वडिलांचे निधन
गुरमेलचे आई-वडील मरण पावले आहेत. त्याचे वय सुमारे 23 वर्षे आहे. त्याची आजी त्याच्या सावत्र भावासोबत गावात राहते. 2019 मध्ये गुरमेलने सुनील नावाच्या तरुणाचा खून केला होता. यानंतर त्याला अटक करून कैथल तुरुंगात पाठवण्यात आले. कैथल तुरुंगातच तो गँगस्टर लॉरेन्सच्या साथीदारांच्या संपर्कात आला. यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर तो मुंबईला गेला. मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांशी संपर्क साधून गोळीबार करणाऱ्याची माहिती मागवली आहे. आता हरियाणा एसटीएफ गुरमेल बलजीत सिंहची माहिती गोळा करत आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर ९.९ एमएमच्या पिस्तुलाने गोळ्या आरोपींनी झाडल्या. आरोपींनी 7 राउंड फायर केले होते. त्यापैकी तीन गोळ्या सिद्दिकी यांना लागल्या आणि एक गोळी सिद्दिकीसोबत असलेल्या व्यक्तीला लागली.