बाबा सिद्दिकीची हत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबियांनी सांगितले… तो पुण्यात गेला पण….

lawrence bishnoi news update: मुंबई पोलिसांनी घटनेच्या रात्रीच तीन आरोपींपैकी दोघांना पकडले होते. यामधील तिसरा आरोपी शिवा अद्याप फरार आहे. शिवा 5-6 वर्षांपासून पुण्यात काम करत होता. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत या टोळीने ही जबादारी स्वीकारली.

बाबा सिद्दिकीची हत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबियांनी सांगितले... तो पुण्यात गेला पण....
Baba Siddique
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 3:26 PM

Baba Siddique Shot Dead in Mumbai: सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी हत्या झाली. ही हत्या लाँरेस बिश्नोई गँगने केली. बाबा सिद्दिकीची हत्या करणारा एक आरोपी उत्तर प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशातील बहराइच येथील शिवा उर्फ शिवकुमार गौतम आहे. तो केवळ 18-19 वर्षांचा आहे. त्याची आई म्हणाले, शिवा स्क्रॅपयार्डमध्ये काम करण्यासाठी पुण्यात गेला होता. परंतु तो मुंबईत कसा गेला? हे मला माहीत नाही, असे शिवाच्या आईने म्हटले.

काय म्हणते आरोपीची आई

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी शिवाची आईने एएनआयला सांगितले की, शिवा होळीला घरी आला होता. त्यानंतर तो आला नाही. तो फोनवरसुद्धा माझ्याशी बोलत नव्हता. या घटनेबद्दल मला काहीच माहीत नाही. तो पुण्यात काम करत असल्याचे मला माहीत होते. मुंबईत का आला? काय करत होता? या गोष्टींची आम्हाला कल्पना नाही. तो आमच्याशी काहीच बोलला नाही. त्यामुळे ही घटना कशी घडली हे आपण सांगू शकत नाही. तो गावात राहत असताना विटा उचलण्याचे काम करत होता. बाहेर गेलो तर तीन वर्षांत चांगली कमाई करू, असे तो म्हणत होता. मुलगी आजारी असताना त्याने तीन हजार रुपये पाठवले होते, त्यानंतर त्याने पैसे सुद्धा पाठवले नाही.

हे सुद्धा वाचा

किती वर्षांपासून होता पुण्यात…

मुंबई पोलिसांनी घटनेच्या रात्रीच तीन आरोपींपैकी दोघांना पकडले होते. यामधील तिसरा आरोपी शिवा अद्याप फरार आहे. शिवा 5-6 वर्षांपासून पुण्यात काम करत होता. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत या टोळीने ही जबादारी स्वीकारली. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांचा खून सुपारी देऊन घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला आहे. विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे सत्ताधारी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ही फक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नसून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.