Baba Siddique Death: बाबा सिद्दिकी यांच्या मूळ गावात चूलही पेटली नाही, गावातील प्रत्येक घरात त्यांनी केली होती मदत
Baba Siddique Death: बाबा सिद्दिकी यांना गावात अनेक विकासाची कामे केली. गावात मोफत शिक्षण सुरु केले. मदरसे, कब्रस्तान आणि क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरु केले. गरीब मुलींच्या विवाहाची जबाबदारी त्यांनी उचलली. महाराष्ट्रात राहिल्यानंतरही त्यांचे आपल्या गावावर प्रेम कमी झाले नाही.
Baba Siddique Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली. या घटनेनंतर मुंबईपासून त्यांचे मूळ गाव असलेल्या बिहारमधील गोपालगंजपर्यंत शोकसागर निर्माण झाला आहे. त्यांच्या मूळ गावात रविवारी कोणाच्याही चूलही पेटली नाही. गावातील एक घरे असे नाही, ज्या ठिकाणी बाबा सिद्दिकी यांची मदत पोहचली नाही, असे बाबा सिद्दिकी यांचे पुतणे गुफरान यांनी सांगितले.
गावात अनेक कामे
बाबा सिद्दिकी यांचे मूळ गाव बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यामधील मांझागढ शेख टोली आहे. त्यांच्यासंदर्भात माहिती देताना गुफरान यांनी म्हटले, पाच दशकांपूर्वी ते गाव सोडून अजोबा अब्दुल रहीम यांच्यासोबत मुंबईत गेले. मुंबईतील वांद्रेत ते राहू लागले. विद्यार्थी दशेत असताना ते राजकारणात सक्रीय झाले. तसेच अनेक सामजिक कार्यात पुढे होते. यापूर्वी 2008 मध्ये आणि 2018 मध्ये ते गावी आले होते. त्यावेळी ते राज्यात मंत्री होते.
आज संपूर्ण गाव अनाथ झाले…
बाबा सिद्दिकी यांना गावात अनेक विकासाची कामे केली. गावात मोफत शिक्षण सुरु केले. मदरसे, कब्रस्तान आणि क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरु केले. गरीब मुलींच्या विवाहाची जबाबदारी त्यांनी उचलली. महाराष्ट्रात राहिल्यानंतरही त्यांचे आपल्या गावावर प्रेम कमी झाले नाही. त्यामुळे त्यांच्या हत्येची बातमी ऐकल्यावर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे, असे गुफरान यांनी म्हटले. गावकरी शाह आलम म्हणतात, गावातील एक घर असे नाही, ज्या ठिकाणी बाबा सिद्दिकींनी मदत केली नसेल. आज ते नसल्यामुळे आम्हाला सर्वांना अनाथ झाल्यासारखे वाटत आहेत.
असा आहे परिवार…
बाबा सिद्दीकी हे तीन भाऊ आहेत. त्यापैकी ते सर्वात मोठे आहेत. त्यांचे दोन धाकटे भाऊ रियाझ सिद्दिकी आणि अझीझ सिद्दिकी हे देखील वांद्रे, मुंबईत राहतात. गोपालगंजमधील त्यांचे वडिलोपार्जित घर सध्या दिवंगत मोहम्मद जलालुद्दीन (बाबा सिद्दीकी यांचे चुलत भाऊ) यांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. त्यांना मोहम्मद इमरान, मोहम्मद गुफरान आणि मोहम्मद फुरकान ही तीन मुले आहेत.