महिलांना बलात्काराची धमकी देणारा बजरंग मुनिला अटक; गुन्हा दाखल होताच महिलांची माफी
उत्तर प्रदेशमध्ये नवसंवत्सरच्या मुहूर्तावर महिलांना बलात्काराची धमकी देणाऱ्या महंत बजरंग मुनीला बुधवारी पोलिसांनी अटक केली. या महंताला अटक होण्याआधी महिलांनी त्याच्या अटकेसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे त्याला आता लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी दिल्लीः एका विशिष्ट समाजातील महिला आणि मुलींना बलात्काराची (Rape) धमकी देणारा महंत बजरंग मुनीला (Mahant Bajran Muni) आज अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी खैराबादमध्ये (Uttar Pradesh Kairabad) एका कार्यक्रमात महंत बजरंग मुनीने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वादग्रस्त विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने आपले विधान मागे घेतले होते. समाजात तेढ निर्माण करुन भडकाऊ भाषण करणाऱ्या या साधुला पोलिसांनी ताब्यात घेताच माफी मागितली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये नवसंवत्सरच्या मुहूर्तावर महिलांना बलात्काराची धमकी देणाऱ्या महंत बजरंग मुनीला बुधवारी पोलिसांनी अटक केली. या महंताला अटक होण्याआधी महिलांनी त्याच्या अटकेसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे त्याला आता लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर
खैराबादमध्ये राहणाऱ्या महंत बजरंग मुनीने महिलांचा छळ केला तर त्यांना घरातून आणून सार्वजनिक ठिकाणी बलात्कार करण्यात येईल असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये जमलेल्या गर्दीसमोर महिला आणि मुलींना घरातून आणून त्यांच्यावर बलात्कार केला जाईल अशी बेताल वक्तव्य ते करत आहेत. या महंताचा हाच व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता, त्या नंतर या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली मात्र पोलिसांनी त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला गेला नाही, तर बुधवारी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच माफी
महंत बजरंग मुनिने गर्दीसमोर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जेव्हा त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होऊनरही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. गुन्हा नोंद होईपर्यंत मात्र या महंताने आपण केलेले बेताल वक्तव्य मागे घेतले नव्हते, वा त्याबद्दल माफीही मागितली नव्हती. मात्र गुन्हा दाखल होताच माफी मागितली आहे. त्यावेळी त्याने माझ्याकडून चूक झाली असून महिला आणि मुलींची माफी मागतो असं म्हटले आहे. व्हिडीओच्या शेवटी त्याने मी महिलांचा आदर करतो असंही म्हटले आहे.
इतर कारनामेही उघडकीस
पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे इतर कारनामेही उघडकीस येत आहेत. याआधीही तो एका जमीनच्या वादातून चर्चेत आला होता. उत्तर प्रदेशमधील एका जमीनवर त्याने अवैधरित्या कब्जा घेतला होता. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या साधूजवळ स्थानीक नेत्यांची उठबस असते.
संबंधित बातम्या
NMC Budget | नागपूर मनपाचे नावीन्यपूर्ण 5 उपक्रम कोणते? जाणून घ्या अर्थसंकल्पात वेगळं काय?
सातवीत असताना गरदोर, 14 व्या वर्षी बनली आई! आता स्वतःच मुलीला सांगितला गरोदर होण्यामागचा किस्सा