Baba Siddique Murder : एका महिन्यात तब्बल…बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाने सगळ्या मुंबापुरीला हादरवून सोडलय. बऱ्याच वर्षानंतर मुंबईत इतकी मोठी राजकीय हत्या झाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीतून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

Baba Siddique Murder : एका महिन्यात तब्बल...बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
baba siddique murder case
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 9:01 AM

माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी दसऱ्याच्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली. वांद्र्यातील मुलाच्या निर्मल नगर येथील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित शूटर्सनी मागच्या महिन्याभरात तब्बल 10 वेळा वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

“मोकळी जागा असल्याने मुलाच्या खेरवाडी येथील ऑफिसजवळ सिद्दीकी यांची हत्या करा, असं त्यांना सांगण्यात आलं होतं” असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यावेळी त्यांना गोळीबार करण्याची संधी मिळाली नाही. अनेकदा सिद्दीकी आले नाहीत. काहीवेळा सिद्दीकी यांच्या अवती-भवती त्यांचे बरेच समर्थक असायचे. त्यामुळे हल्लेखोरांना आपला प्लान बदलावा लागला” हल्लेखोरांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.

किती आरोपी अटकेत आहेत?

या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मंगळवारी उत्तर प्रदेश कैसरगंज येथून हरीशकुमार निशाद (24) या आरोपीला अटक केली. त्याला 21 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरमेल सिंग (23) आणि धर्मराज कश्यप (21) आणि डेअरी मालक प्रविण लोणकर यांना या प्रकरणात आधीच अटक झाली आहे. शुभम लोणकरने या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याची सोशल मीडिया पोस्ट केली होती. प्रविण लोणकर त्याचा भाऊ आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात शुभम लोणकरची चौकशी सुद्धा झाली होती. पण सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका झालेली.

भंगाराच दुकान

हरीशकुमार निशाद पुण्यात भंगाराच दुकान चालवत होता. त्याने मागच्यावर्षी भाड्यावर चालवण्यासाठी म्हणून हे दुकान घेतलं होतं. प्रविणच्या डेअरीच्या बाजूलाच हे दुकान होतं. निशाद आपल्या गृहजिल्ह्यातून काही लोकांना त्या दुकानात काम करण्यासाठी म्हणून घेऊन आला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.