सहकाऱ्याच्या मोबाईल तिने पाहिला अन् तिच्या पायाखालची जमीनच सरकली
Crime News | बंगळूरुमधील एका कंपनीत धक्कादायक प्रकार घडला. कार्यालयातील पुरुष कर्मचाऱ्याचा मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो सापडले. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या प्रकरणी कंपनीकडूनही पावले उचलली गेली आहेत. कंपनीने कर्मचाऱ्याविरोधात गुन्हाच दाखल केला नाही तर त्याला बडतर्फ केले आहे.
बंगळुरु, दि. 1 डिसेंबर 2023 । बंगळुरुमधील एका कंपनीत धक्कादायक घटना घडली आहे. एकाच बीपीओमध्ये काम करणारे दोन सहकारी होते. कंपनीतील 22 वर्षीय महिलेने सहकाऱ्याचा मोबाईल त्याला न कळत पाहिला. त्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला प्रचंड धक्का बसला. ती महिला त्या सहकाऱ्यासोबत चार महिने रिलेशनशिपमध्ये होती. तिने हा प्रकार कंपनीतील वरिष्ठांना सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात महिलांचे 1300 न्यूड फोटो मिळाले. या प्रकरणानंतर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. कंपनीकडून कठोर पाऊल उचलत त्या कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात आले. आदित्य संतोष असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीसोबत चार महिने रिलेशनशिपमध्ये होती महिला
एकाच कार्यालयात असलेली ती महिला आणि आदित्य चार महिने रिलेशनशिपमध्ये होते. त्याचवेळी आदित्यने तिचे काही फोटो काढले होते. तसेच अनेक फोटो तिला न समजताच काढले होते. या प्रकरणी कंपनीने दिलेल्या तक्रारीनंतर आदित्य संतोष याला अटक करण्यात आली आहे. आदित्य याच्या फोनची पोलिसांनी तपासणी केली. त्यात पोलिसांना अनेक व्हिडिओ सापडले. त्यात काही फोटो आणि व्हिडिओ सॉफ्टवेअरचा वापर करुन बनवण्यात आले होते.
फोटो काढण्याचा काय होता उद्देश
कंपनीने महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षेला प्राधान्य देत या प्रकरणी पावले उचलली आहे. आदित्य संतोष विरोधात गुन्हाच दाखल केला नाही तर कंपनीतून त्याला बडतर्फ करण्यात आले. दुसरीकडे पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरु केली आहे. त्याच्या चॅट आणि फोन कॉलची तांत्रिक तपासणी केली जात आहे. आदित्य याने महिलांचे फोटो मोबाईलमध्ये का संग्रहीत केले? त्याने यापूर्वी कोणाला ब्लॅकमेल तर केले नाही ना? या सर्व बाबींचा उलगडा पोलिसांच्या तपसातून होणार आहे.