सरकारी शाळा बनली डान्स बार, ज्ञान मंदिरात छमछम, लाजिरवाणी घटना

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात विचित्रप्रकार समोर आला आहे. देसरी येथील सरकारी शाळेच्या प्रांगणात बार बालांचा डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या इमारतीत रात्रभर डान्सचा कार्यक्रम सुरु होता.

सरकारी शाळा बनली डान्स बार, ज्ञान मंदिरात छमछम, लाजिरवाणी घटना
सरकारी शाळा बनली डान्स बार, ज्ञान मंदिरात छमछम, लाजिरवाणी घटना
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 3:25 PM

पाटणा : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात विचित्रप्रकार समोर आला आहे. देसरी येथील सरकारी शाळेच्या प्रांगणात बार बालांचा डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या इमारतीत रात्रभर डान्सचा कार्यक्रम सुरु होता. अनेक जण यात सहभागी झाले. पण पोलिसांपर्यंत त्याची चाहुलही पोहोचली नाही. अखेर या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर संपूर्ण बिहार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत शाळेचं नाव ठळकपणे दिसतंय

विशेष म्हणजे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत शाळेचं नाव ठळकपणे दिसत आहे. त्याचबरोबर बारबालांसोबत काही गावकरीदेखील ठुमके लावताना दिसत आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळाली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शाळेत अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणं हे लाजिरवाणं आहे, अशी प्रतिक्रिया आता सर्वच स्ताराकरुन उमटत आहेत.

शाळेचे मुख्यध्यापक गायब

याबाबत शाळेचे मुख्यध्यापकांना विचारलं जाईल. रात्री उशिरा शाळा कशी उघडण्याच आली आणि अशा प्रकाराचा कार्यक्रम आयोजित करण्याची अनुमती कुणी दिली याचाही तपास केला जाईल, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे संबंधित प्रकरण उघड झाल्यापासून शाळेचे मुख्यध्यापक गायब झाले आहेत, अशी देखील माहिती आता समोर येत आहे. यादरम्यान स्थानिक पत्रकारांशी बातचित करताना आपल्याला या कार्यक्रमाबाबत माहिती नव्हती. शाळेच्या मुख्य गेटचं लॉक तोडून हा कार्यक्रम करण्यात आला, असं मुख्यध्यापक म्हणाले आहेत. पण त्यानंतरपासून शाळेचे मुख्यध्यापक गायब झाले आहेत.

पोलिसांचा तपास सुरु

पोलीस सध्या मुख्यध्यापकाचा शोध घेत आहेत. मुख्यध्यापक सापडल्यानंतर या प्रकरणात नेमकं कोण होतं याबाबतची माहिती मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. याशिवाय मुख्यध्यापकाने शाळेचा लॉक तोडून हा कार्यक्रम आयोजित केला असं सांगितलं होतं. पण ते खोटं असल्याचं तेथील काही स्थानिकांचं म्हणणं आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा :

वॉचमनला मारहाण करुन घरफोड्या, सीसीटीव्हीत कैद झालेली टोळी अंबरनाथमध्ये कशी सापडली?

बायकोचे आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाठवले, भावोजींकडून धमकावून बलात्कार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.