VIDEO | अतिक्रमण का काढले म्हणून बीडमध्ये ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या पतीला घेरलं, झटापटीचा व्हिडीओ व्हायरल
अतिक्रमण का काढले म्हणून एका कुटुंबाने ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या पतीला घेरलं. झटापटीचा सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी, दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध पाटोदा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

बीड : अतिक्रमण का काढले म्हणून एका कुटुंबाने ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या पतीला घेरलं. झटापटीचा सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी, दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध पाटोदा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा येथील शिवीगाळ आणि झटापटीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. रायमोहा येथील ग्रामपंचायतकडून सध्या अतिक्रमण काढण्याचे कार्य सुरु आहे. त्यात अतिक्रमण का काढले म्हणून ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेच्या पतीला एका कुटुंबाने धारेवर धरले. एवढंच नाही तर महिला सदस्याच्या पतीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आली.
या अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. ही घटना तीन दिवसांपूर्वीची आहे. याप्रकरणी रायमोहा पोलीस चौकीत याची नोंद झाली असून पाटोदा पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.
पाहा व्हिडीओ –
गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचा अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक आणि दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश मेनन यांना 10 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेआहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचलुचपत विभागाची आजपर्यंतची ही पहिलीच घटना आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदाराचे हार्डवेअर आणि भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या नावे असलेल्या किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याचे नूतनीकरण आणि हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता. परंतु राजेश मेनन यांनी यासाठी 10 हजारांची मागणी केली होती.
भरधाव पिकअप बॅरिकेट्स तोडून थेट दुकानात शिरली, एकाचा मृत्यू, दुकानाचं प्रचंड नुकसानhttps://t.co/vqWqwNfxca#Nashik #Accident #NashikAccident #Igatpuri
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
संबंधित बातम्या :
चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?