Beed | भिंतीला भगदाड पाडून केज येथे मोबाईल शॉपीत चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद!

या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब आणि केज-बीड रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळ आणि पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर सचिन ज्ञानोबा देशमुख (रा. वरपगाव ता. केज ह. मु. केज) यांचे मोबाईल विक्री व दुरूस्तीचे श्रीराम मोबाईल शॉपी आहे.

Beed | भिंतीला भगदाड पाडून केज येथे मोबाईल शॉपीत चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:07 AM

बीड : बीड (Beed) जिल्हामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. आता तर चक्क पोलिस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटरवर असणाऱ्या मोबाईल शॉपीच्या (Mobile shop) भीतीला भगदाड पाडून चोरट्यांनी मोठा हात मारला. ही घटना बीडमधील केज येथे घडली असून पोलिस ठाणे इतक्या जवळ असूनही चोरी कशी होऊ शकते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला आहे. पोलिसांच्या (Police) नाकावर टिच्चून चोरी करत चोरांनी मोबाईल, हेड फोन, पॉवर बँक आणि इतर काही महत्वाचे साहित्य चोरून नेले आहे.

पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटरवर मोबाईल शाॅपी

या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब आणि केज-बीड रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळ आणि पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर सचिन ज्ञानोबा देशमुख (रा. वरपगाव ता. केज ह. मु. केज) यांचे मोबाईल विक्री व दुरूस्तीचे श्रीराम मोबाईल शॉपी आहे. दि. 2 जुलै शनिवार रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यानी मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला. मोबाईल शॉपीतील मोबाईल, हेड फोन, ब्ल्यू टूथ, पॉवर बँक, चार्जर आणि चार्जिंग कॉर्ड असे सुमारे एक लाख रु किमतीचे मोबाईल व साहित्य लंपास केले.

हे सुद्धा वाचा

तिजोरी उघडली नसल्याने लाखोंचे मोबाईल वाचले

श्रीराम मोबाईल शाॅपिच्या तिजोरीत महागडे व नामांकित कंपन्यांचे मोबाईल ठेवलेले होते. परंतु सुदैवाने चोरट्यांना तिजोरी फोडता न आल्यामुळे लाखो रुपयांची चोरी टळली.

चोरटे सीसीटीव्हीत कैद

मोबाईल शॉपीमध्ये सीसीटीव्ही असून चोरट्यानी आत प्रवेश केल्यानंतरच्या हालचाली त्यात कैद झालेल्या असून एकाच्या तोंडावर मास्क आहे तर दुसऱ्याने कापडाने तोंड झाकले आहे. या चोरांनी शाॅपीमध्ये नेमके काय केले हे सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी पाचारण

मोबाईल शॉपीतील चोरीचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळीं आढळलेल्या एक टॉवेल श्वानला हुंगण्यास दिली असता श्वान हे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणा शेजारी असलेल्या मस्जिद परिसर आणि केज-कळंब रोड जवळ त्याने माग काढला.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.