IND vs PAK मॅचआधी दोन दहशतवाद्यांना उचललं, मोठं कारस्थान उघड
IND vs PAK : आज भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामना होणार आहे, त्याआधी ही कारवाई झाली. देशाला हादरवून सोडण्याच कारस्थान या दहशतवाद्यांनी रचलं होतं. पंजाब पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन सेलने ही कारवाई केली.
चंदीगड : भारत-पाकिस्तान मॅचआधी पंजाब पोलिसांनी लश्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. देशाला हादरवून सोडण्याच कारस्थान त्यांनी रचल होतं. या दहशतवाद्यांना अमृतसर येथून अटक करण्यात आली. पंजाब पोलिसांनी केंद्रीय एजन्सीसोबत मिळून ऑपरेशन केलं. त्यात यश मिळालं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी टि्वट करुन ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडे दोन आयईडी, दोन हँड ग्रेनेड, दोन मॅगझीन, एक पिस्तुल, 24 काडतूस, एका टायमर स्विच, 8 डेटोनेटर आणि चार बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत. अमृतसर पोलिसांनी केंद्रीय एजन्सीसोबत मिळून एक गोपनीय ऑपरेशन केलं.
त्यात त्यांनी लश्करच्या मॉड्यूलचा भंडाफोड केला. दोघांना अटक करण्यात आली असून ते जम्मू-काश्मीरचे निवासी आहेत. लश्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य फिरदौस अहमद भटकडे दहशतवादी मॉड्यूलची जबाबदारी आहे. पंजाब पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन सेलने केंद्रीय एजन्सीसोबत मिळून ही कारवाई केली. पंजाबमध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी हा एक झटका आहे, असं पोलीस महासंचालक गौरव यादव म्हणाले. खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाई
पंजाबच्या मोगामध्ये काँग्रेस नेते आणि सरपंचाच्या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. कॅनडातील खालिस्तानी दहशतवादी अर्श दल्लाच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली. अर्श दल्लाने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. चौकशी केल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. दोघेही अटक टाळण्यासाठी पळत होते.