धक्कादायक: भीक मागण्यासाठी दीड लाखात विकत घेतली दोन मुले, 100 रुपयांच्या बाँडवर व्यवहार, औरंगाबादेत भिकाऱ्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

महिला आरोपी सविता पगारे हिने 5 वर्षीय मुलाला बुलडाणा जिल्ह्यातून आई-वडिलांकडून 55 हजार रुपयांत विकत घेतले तर दुसऱ्या 2 वर्षीय मुलाला जालना जिल्ह्यातून 1 लाख रुपयांच्या बाँडवर दत्तक घेतल्याचे सांगितले.

धक्कादायक: भीक मागण्यासाठी दीड लाखात विकत घेतली दोन मुले, 100 रुपयांच्या बाँडवर व्यवहार, औरंगाबादेत भिकाऱ्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 10:40 AM

औरंगाबाद: घराच्या अंगणातच खेळा, नाही तर पोरधरी बाई येऊन तुम्हाला घेऊन जाईल, दुसरीकडे नेऊन भीक मागायला लावेल, अशी धमकीवजा समज पूर्वीच्या काळी लहान मुलांना दिली जायची. पण आई-वडील आणि नातवाईकांनीच अशा भिकाऱ्यांच्या टोळीला मुले विकल्याची घटना औरंगाबादेत समोर आली आहे. मुलांना भीक मागायला लावणाऱ्या  एका रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. यासाठी या लोकांनी दोन मुले तब्बल दीड लाखात विकत घेतल्याची घटना मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत (Mukundwadi Police Station) बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

लाकडी पट्टीने बेदम मारत होत्या..

मुकुंदवाडी परिसरातील रामनगर येथील रहिवासी कांताबाई खंडागळे यांनी जनाबाई उत्तम जाधव ही महिला तिच्या घरात असलेल्या लहान मुलांचा अमानुषपणे छळ करत असल्याचे वारंवार पाहिले होते. बुधवारी रात्री त्यांनी समाजसेवक देवराज वीर यांना फोन करून जनाबाई लहान मुलास क्रूरपणे मारहाण करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर देवराज वीर घटनास्थळी पोहोचले. तेव्हा जनाबाई आणि तिची मुलगी सविता संतोष पगारे या दोघी एका मुलाला लाकडी पट्टी आणि हाताने मारत होत्या. हृदय पिळवटून टाकणारा हा प्रकार पाहून वीर यांनी पाच वर्षाच्या मुलास त्यांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर पोलिस कर्मचारी खान यांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या दोन महिला आणि मुलांना मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेले.

भीक मागितले नाही तर कापून टाकण्याची धमकी

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बालकल्याण संरक्षण कक्षाच्या अधिकारी अॅड सुप्रिया इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बाजारे, कैलास पंडित यांना बोलावून घेतले. या दोन्ही मुलांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली. तेव्हा ही मुले बोलती झाली. मला भीक मागण्यासाठी येथे आणले असून तसे नाही केले तर खूप भयंकर शिक्षा केली जाते, असेही सांगितले. त्यांचे ऐकले नाही तर लाथाबुक्क्यांनी मारहाण, बाथरुममध्ये झोपायला लावणे, तासन् तास पाण्यात बसवून ठेवले जात होते, असे मुलांनी सांगितले.

बुलडाणा व जालन्यातून विकत घेतली मुले

या प्रकरणातील महिला आरोपींनी आम्ही ही मुले दत्तक घेतल्याचा दावा केला आहे. यासाठी100 रुपयांच्या बाँडवर व्यवहार झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र संपूर्ण तपासाअंती मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिला आरोपी सविता पगारे हिने 5 वर्षीय मुलाला बुलडाणा जिल्ह्यातून आई-वडिलांकडून 55 हजार रुपयांत विकत घेतले तर दुसऱ्या 2 वर्षीय मुलाला जालना जिल्ह्यातून 1 लाख रुपयांच्या बाँडवर दत्तक घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी समाजसेवक देवराज नाथाजी वीर यांनी फिर्याद दिली. दरम्यान, दोन्ही मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांनी दिली.

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: 60 किमीचा फिल्मी स्टाइल थरार, ट्रायल म्हणून कार पळवणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या

HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.