माझं लग्न झालंय, तू मला विसर, ब्रेकअप केलेल्या प्रेयसीवर प्रियकाराचा Acid Attack, पण जखमी झाली सासू!

ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. हल्लेखोर तरुणानं त्यांच्या घरातूल मागच्या दारामार्गे घुसून ऍसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

माझं लग्न झालंय, तू मला विसर, ब्रेकअप केलेल्या प्रेयसीवर प्रियकाराचा Acid Attack, पण जखमी झाली सासू!
ऍसिड हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 5:19 PM

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहिक प्रेयसीनं आपल्या प्रियकराच्या नात्यास नकार दिल्यानं हताश झालेल्या प्रियकरानं टोकाचं पाऊल उचचलंय. आपल्या प्रेयसीवर त्यांनी ऍसिड हल्ला केला. या ऍसिड हल्ल्यात विवाहित प्रेयसीऐवजी तिची सासू जखमी झाली आहे. ऍसिड हल्ल्याच्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगलाच्या हुगळी जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय. पण नेमकी या हल्ल्यात विवाहित प्रेयसीची सासू कशी जखमी झालं, याचाही उलगडा अखेर झाला आहे. तर ऍसिड हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

लग्न झाल्यानं ब्रेकअप!

लग्न झाल्यामुळे प्रियकरासोबत नातं ठेवण्यास नकार दिलेल्या एका मुलीवर तिच्या प्रियकरानं बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्यानं या विवाहित मुलीवर ऍसिडनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या प्रसंगावधानामुळे ती थोडक्यात या हल्ल्यातून बचावली. मात्र या हल्ल्यात विवाहित मुलीची सासू जखमी झाली आहे.

नेमकी कधीची घटना?

ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. हल्लेखोर तरुणानं त्यांच्या घरातूल मागच्या दारामार्गे घुसून ऍसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीनं आपला चेहरा कपड्यानं लगेचच झाकून घेतला. त्यामुळे मुलगी यातून थोडक्यात बचावली आहे. मात्र ऍसिड सासूच्या अंगावर, हातावर आणि पायावर पडल्यामुळे त्यांना गंभीर जखम झाली आहे. या हल्ल्यानंतर मुलीनं आणि तिच्या सासूनं एकच आरडाओरडा केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. यामुळे भयभीत झालेला तरुण पसार झाला.

हल्लेखोराला अटक

अखेर याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी हल्लेखोर तरुणाच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर तरुणाचा शोध घेत त्यालाही बेड्या ठोकल्यात. शनिवारी सकाळी पोलिसांनी ऍसिड हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. कम 307, 448, 323, 325, 326A, 506 अन्वये याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता हल्लेखोर तरुणाची कसून चौकशी केली जाते आहे.

इतर बातम्या –

Pune crime | शीतपेयांमधून दारू पाजत महिलेसोबत केले ‘हे’ कृत्य

स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, छाप्यात दहा जणी सापडल्या, ‘चौघीं’चं झालेलं लिंगबदल

वादावादीतून टोकाचं पाऊल, आधी बायकोची हत्या, मग नवऱ्याचे विषप्राशन

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.