बंगळुरुमध्ये ‘बुराडी’ची पुनरावृत्ती, पंख्याला 5 लटकलेले मृतदेह, 9 महिन्यांच्या मुलीचाही करुण अंत, देशाला हादरवणारी घटना

बेंगळुरूच्या ब्यादरहल्ली भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एकाच घरात पाच सदस्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले आहेत. देशाला हादरवून सोडणारी ही घटना आहे.

बंगळुरुमध्ये 'बुराडी'ची पुनरावृत्ती, पंख्याला 5 लटकलेले मृतदेह, 9 महिन्यांच्या मुलीचाही करुण अंत, देशाला हादरवणारी घटना
फोटो : सांकेतिक
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 1:30 PM

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सन 2018 मध्ये बुराडी येथे झालेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने सर्वांच्याच अंवाक काटा आला होता. आताही असंच एक प्रकरण बेंगळुरूच्या ब्यादरहल्ली भागातून समोर आलं आहे. जिथे एकाच घरात पाच सदस्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले आहेत. जेव्हा पोलिसांनी घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना घरातले चार सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये छताच्या पंख्याला लटकलेले आढळले. तर नऊ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला.

9 महिन्याच्या मुलीचा मृत्यू कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर उपासमारीने झाला असावा, असा अंदाज काही रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच वर्षांच्या मुलीला घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. तिला सध्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भारती (51 वर्षे), सिंचन (34 वर्षे), सिंधुराणी (31 वर्षे) आणि मधुसागर (25 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. डीसीपी (पश्चिम) संजीव एम.पाटील यांनी सांगितलं की, पत्रकार हुलागुरे शंकर चार दिवसांनी घरी गेल्यावर ही घटना उघडकीस आली.

वेगवेगळ्या खोल्यांमध्ये छताच्या पंख्याला लटकलेले मृतदेह आढळले

शंकरने घराचा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो उघडू शकला नाही. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला, त्यानंतर हे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली, अशी माहिती पोलीस अधिकारी पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, घरात प्रवेश केल्यावर चार लोकांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत पंख्याला लटकलेले आढळले. तर एका मुलीचा मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळला.

दिल्लीमधल्या बुराडी येथेही असंच एक प्रकरण समोर आले होते, जिथे एकाच घरातील 11 लोकांनी एकत्र आत्महत्या केली होती. ही घटना ऐकून लोकांना अजूनही लोकांच्या काळजात धस्स होतं. ही घटना आजही प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येकाच्या मनात एकाच प्रश्न होता की, संपूर्ण कुटुंब एकत्र कसं आत्महत्या करु शकतं? कुटुंबाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीत लिहिलं होतं की, आम्ही हे मोक्ष मिळवण्यासाठी करत आहोत. 1 जुलै रोजी घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.

(bengalure byadrahalli suicide 5 people suicide nine month baby death)

हे ही वाचा :

सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा; CBDT ने सांगितली मोडस ऑपरेंडी

जाचाला कंटाळून विवाहितेचा गळफास, माहेरच्यांनी सासरच्या दारातच चिता पेटवली

आई शेतात गेली, नराधमांकडून गतिमंद तरुणीवर घरात घुसून बलात्कार, महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.