हनुमान चालीसा लावली म्हणून दुकानदाराला मारहाण, आता त्याच्यावरच FIR, असं का?
अजान v/s भजन प्रकरणात मारहाण झालेल्या दुकानदाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. मुकेशसोबत मारहाण प्रकरणात सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश, तरुण आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीची ओळख पटवण्यात आली होती.
अजान Vs भजन हा वाद थांबण्याच नाव घेत नाहीय. अलीकडेच बंगळुरुमध्ये मुकेश नावाच्या दुकानदाराला मारहाण झाली होती. कारण त्याने अजानच्यावेळी हनुमान चालीसा लावल्याचा आरोप होता. या प्रकरणात कोर्टाच्या आदेशावरुन पोलिसांनी आरोपी विरोधात कारवाई केली होती. पण आता पोलिसांनी या प्रकरणी मारहाण झालेल्या दुकानदाराविरोधात FIR नोंदवली आहे. कर्नाटकच्या बंगळुरुमधील हे प्रकरण आहे.
दुकानदार मुकेशच्या मारहाण प्रकरणात अटकेत असलेला आरोपी सुलेमानची आई महजबीनने FIR नोंदवलाय. एका न्यूज पेपरमध्ये या संबंधी वृत्त प्रकाशित झालय. तिने दुकानदाराविरुद्ध एफआयआर नोंदवला. मुकेशने अजानच्यावेळी हनुमान चालीसा मोठ्या आवाजात वाजवली होती. त्याआधी त्याने हळू आवाज ठेवला होता. अजान सुरु होताच त्याने साऊंड सिस्टिमचा आवाज वाढवला. जेव्हा सुलेमान आणि त्याच्या मित्राने मुकेशला टोकलं, तेव्हा मुकेश त्यांना भिडला. आरोपी सुलेमानच्या आईच म्हणणं आहे की, आधी मुकेशने मारहाण सुरु केली.
भजन बंद कर म्हणून सांगितलं
मुकेशसोबत मारहाणीच हे प्रकरण 17 मार्च 2024 च आहे. मुकेशसोबत मारहाण प्रकरणात सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश, तरुण आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीची ओळख पटवण्यात आली होती. मुकेशने दावा केला की, 4-5 लोक त्याच्या दुकानावर आले. ते भजन बंद कर म्हणून सांगू लागले. त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर मुकेशसोबत मारहाण झाली. आता या प्रकरणात पुढे काय होतं, ते पहाव लागेल.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालेला
पोलिसांनुसार, घटनेच्या तीन दिवसानंतर त्यांना तक्रार मिळाली. पोलिसांनी NCR नोंदवला. कोर्टाच्या परवानगीनंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम 323, 504 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला. मुकेशच्या मारहाणीच्या व्हिडिओच सीसीटीव्ही रेकॉर्डिंग झालं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालेला.