Bhandara Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! भरधाव एसटीची दुचाकीला धडक, अपघातात झेडपी शाळेचा शिक्षक ठार

Bhandara Accident : शिक्षक कुलदीप यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे

Bhandara Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! भरधाव एसटीची दुचाकीला धडक, अपघातात झेडपी शाळेचा शिक्षक ठार
शिक्षकाचा अपघाती मृत्यू...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 8:41 AM

भंडारा : भरधाव एसटी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक ठार (Teacher died) झाला. भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara accident news) लाखांदूर तालुक्यात ही घटना घडली. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात (Road accident) झाला. बारव्हा ते खोलमारा रस्त्यावरील टी-पॉइंट वळणावर एसटी बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये भरधाव एसटीने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये कुलदीप गिरधर नारनवरे या शिक्षकाचा मृत्यू झाला. या शिक्षकाचं वय 35 वर्ष असून ते गोंदिया जिल्ह्यातील रोसमतोंडी येथील धानोरी इथं राहणारे होते. ते लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होते. आपल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी नारनवरे जात होते. त्यावेली हा अपघात घडला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतेय.

नेमका कसा झाला अपघात?

कुलदीप दुचाकीने पारडी येथून तई येथे नातेवाइकाकडे जात होते. त्यावेळी बारव्हा येथून साकोलीकडे जाणाऱ्या एसटी बसने खोलमारा गावातल्या वळणावर दुचाकीची सामोरून धडक दिली. धडक एवढी जबर होती की शिक्षक कुलदीप दुचाकीसह खाली कोसळून गंभीर जखमी झाले.

पत्नी, मुलगी यांचं छत्र हरपलं

अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे असलेल्या नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या कुलदीप नारनवरे यांना बारव्हा आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शिक्षक कुलदीप यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्यानं नारनवरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित असलेल्या शिक्षकांच्या मृत्यूने बारव्हा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरु होतील. मात्र विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या शिक्षणकाच्या अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.