भिवंडी : भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात दुचाकी आणि चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. येथील शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यासह विविध 16 गुन्ह्यांची उकल करीत 12 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमालदेखील जप्त केला आहे. ज्यामध्ये दुचाकी चोरी, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न, अंमली पदार्थ संबंधातील गुन्ह्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. (Bhiwandi police arrest 9 accused in Theft, robbery case, seize lakhs worth of property)
शांतीनगर पोलीस अधिकारी यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन पिराणी पाडा शांतीनगर येथील दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडील भिवंडीसह नवी मुंबई, मुंब्रा या भागातून चोरी केलेल्या 8 दुचाकी, पाच बेवारस दुचाकी, दोन मोबाईल, एक सोन्याची चैन असा एकूण 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर पोलीस गस्तीदरम्यान रात्री अडीच वाजताच्या सुमारास एका कारमध्ये आढळून आलेल्या तिघा संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, मिरची पूड, कुकरी अशी शस्त्र आढळली.
चौकशीत टेमघर येथील अशापुरा ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा त्यांचाइरादा होता, असे त्यांनी सांगितले. परंतु पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्यापूर्वीच आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. तर गायत्री नगर दत्त मंदिराजवळील घरातून 81 हजार 560 रुपये किमतीचा 4 किलो 78 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. संजय नगर परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या जवळून 10 हजार रुपये किंमतीच्या नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचा (अंमली पदार्थ) साठा जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहा पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पोलीस पथकांनी या कारवाया करीत तब्बल 12 लाख 91 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पथकाने 16 गुन्ह्यांची उकल करून एकूण नऊ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे.
इतर बातम्या
डोक्यात फावडे घालून हत्या करणाऱ्या तिघांना बेड्या, शिर्डीतील पती-पत्नीच्या खुनाचा उलगडा
भाजपच्या माजी नगरसेविकेची 17 वेळा चाकूने भोसकून हत्या, नणंद आणि भाच्याला अटक
(Bhiwandi police arrest 9 accused in Theft, robbery case, seize lakhs worth of property)