Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरी करायला आले अन् डोक्यात दगड घालून केला खून, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लुटीच्या उद्देशाने आलेल्या तसेच कंटेनर चालकाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींच्या भिवंडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यातील पहिल्या आरोपीचे नाव किशोर नथू पाटील असे असून दुसरा आरोपी हा अल्पवयीन आहे.

चोरी करायला आले अन् डोक्यात दगड घालून केला खून, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलिसांनी आरोपींकडून तीन मोबाईल जप्त केले आहेत.
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 11:39 PM

ठाणे : लुटीच्या उद्देशाने आलेल्या तसेच कंटेनर चालकाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींच्या भिवंडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यातील पहिल्या आरोपीचे नाव किशोर नथू पाटील असे असून दुसरा आरोपी हा अल्पवयीन आहे. कोणताही पुरावा नसताना फक्त फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या आरोपींना पकडले आहे. (Bhiwandi Police arrested Two accused for murdering Container driver One is minor)

दगडाने ठेचून कंटेनर चालकाची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार 29 मे रोजी रात्री भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील राजलक्ष्मी कंपाऊंड भागात दोन कंटनेर चालक आपले कंटेनर घेऊन आले होते. हे दोन्ही कंटेनर चालक माल भरण्यासाठी नवी मुंबई येथून आले होते. यावेळी रात्र झाल्यामुळे त्यांनी तेथेच कंटेनर पार्क करून झोपण्याचा निर्णय घेतला. यापैकी आझम शाबल अन्सारी हा कंटेनर चालक कंटेनरमध्येच झोपला होता. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केलेले आरोपी दुचाकी वरून आले होते. हे आरोपी लुटीच्या उद्देशाने चालकाच्या कॅबिनमध्ये घुसले होते.

मात्र, कॅबिनमध्ये घुसल्यानंतर कंटेनरमध्ये झोपलेल्या आझम अन्सारी या चालकाला जाग आली. त्यांतर चालक आणि अटक करण्यात आलेले आरोपी यांच्यात वाद सुरु झाला. “मी नेहमी येथे गाडी घेऊन येतो. मला का त्रास देता ? असा जाब कंटेनर चालक अन्साही यांनी अटक केलेल्या दोघांना विचारला. या प्रश्नानंतर दोन्ही आरोपींनी कंटेनर चालकासोबत वाद घालणे सुरु केले. “आम्ही गाववाले आहोत. कोठेही फिरणार. तू कोण विचारणारा ?” असे बोलून दोन्ही आरोपींनी कंटेनर चालकाला शिवीगाळ केली. तसेच ते निघून गेले. मात्र, काही वेळात परत येऊन या आरोपींनी आझम शाबल अन्सारी याच्या डोक्यात दडग घालून त्याची हत्या केली होती.

आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या ?

या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी पोलिसांची गुन्हे शाखा करत होती. या गुन्ह्याबाबत कोणताही पुरावा नसताना दुसरा कंटेनर चालक फिर्यादी सत्यप्रकाश मिश्रा याने दिलेल्या माहितीवरुनच पोलिसांनी तपास करणे सुरु केले. पोलीस अधिकारी अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लतीफ मन्सूरी यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांनी स्थानिक गुन्हेगारांची माहिती घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार किशोर पाटील याला मिठपाडा येथे सापळा रचून ताब्यात घेतले. तसेच त्याचा 17 वर्षीय अप्लवयीन साथीदार यालाही पोलिसांनी पकडले.

किशोर पाटील सराईत गुन्हेगार

दरम्यान, पोलिसांनी या दोघांचीही चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. चौकशीदरम्यान या आरोपींकडून तीन मोबाईल आढळून आले आहेत. या मोबाईलविषयी चौकशी केली असता या आरोपींनी 10 जून रोजी एका गोदामात झोपलेल्या कामगाराचे मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. किशोर पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वी चोरी, घरफोडी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

इतर बातम्या :

गिफ्ट द्यायच्या बहाण्याने घरी बोलावलं, नंतर मुलावरच झाडल्या तीन गोळ्या, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याने नवी मुंबई हादरली

आधी खून नंतर जाळलं, युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने साताऱ्यात खळबळ

‘भारी’ गावाजवळ ‘हाय प्रोफाईल’ जुगार, तब्बल 81 लाखांचा मुद्देमाल जप्त, 19 अट्टल जुगारी गजाआड

(Bhiwandi Police arrested Two accused for murdering Container driver One is minor)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.