घरकाम मिळवून देण्याच्या बहाण्याने घरी नेलं, चहातून गुंगीचं औषध दिलं अन्…

घरकाम करणाऱ्या महिलांना हेरून, त्यांना लक्ष्य करायचे. त्यानंतर ओळख वाढवून त्यांना घरी न्यायचे. चहामध्ये गुंगीचं औषध टाकून बेशुद्ध करायचे आणि त्या महिलांना लुटायचे. अनेक महिलांना अशा प्रकारे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला असून दोघांना अटक केली आहे.

घरकाम मिळवून देण्याच्या बहाण्याने घरी नेलं, चहातून गुंगीचं औषध दिलं अन्...
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 3:16 PM

घरकाम करणाऱ्या महिलांना हेरून, त्यांना लक्ष्य करायचे. त्यानंतर ओळख वाढवून त्यांना घरी न्यायचे. चहामध्ये गुंगीचं औषध टाकून बेशुद्ध करायचे आणि त्या महिलांना लुटायचे. अनेक महिलांना अशा प्रकारे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला असून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणात एक महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बिबवेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्या आरोपींकडून २ लाखांहून अधिकचे सोन्याचे दागिने मोटार सायकल, मोबाईल आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

याबाबत फिर्यादी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 12 जून रोजी संबंधित महिला भारत ज्योती बसस्टॉप बिबवेवाडी येथे उभी असताना पीडित महिला त्यांना भेटली. काम देण्याचा बहाणा करून ती फिर्यादी महिलेला लक्ष्मी रोड येथील घरी घेवून गेली. तिथे आरोपी महिलेने तिला चहामधून गुंगीचं औषध दिलं आणि ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी महिलेने तिच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून घेतले तसेच मोबाईल हिसकावून घेतला. आणि त्यानंतप पीडित महिलेला रात्री १० च्या सुमारास फुरसुंगी येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले. दागिने व मोबाईल लुटल्यामुळे पीडित महिला खूप घाबरली. तिने बिबवेवाडी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तपास सुरू केला. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली.

त्यानंतर गुन्हयातील २ लाख ४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, मोटर सायकल, मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला. याचा अधिक तपास सुरू असून, अशीच घटना आणखी कोणासाबोत घडली असेल चर त्यांनी पुढे यावे आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.