नागपूरच्या एम्समध्ये इंजेक्शन घोटाळा उघड, दोन आरोपींना अटक, काय आहे नेमकं प्रकरण?

नागपुरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंजेक्शन घोटाळ्याने उपराजधानीत एकच खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या एम्समध्ये इंजेक्शन घोटाळा उघड, दोन आरोपींना अटक, काय आहे नेमकं प्रकरण?
नागपुरातील एम्स रुग्णालयात इंजेक्शन घोटाळाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 2:20 PM

नागपूर : एकच इंजेक्शन एकापेक्षा अधिक लोकांना दिल्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. अगदी HIV पर्यंतही प्रकरण जाऊ शकतं. याची कल्पना असतानाही नागपुरातल्या एम्समध्ये हा प्रकार घडत आहे. यानिमित्ताने इंजेक्शन घोटाळा समोर आलाय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, हॉस्पिटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे. तपासात अजून काय उघड होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नागपुरच्या एम्स रुग्णालयात घडला प्रकार

नागपूरच्या एम्स रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला. इथे इंजेक्शन आणि सिरिंज खरेदीमध्ये मोठी हेराफेरी केली जात होती. सिरिंज इंजेक्शनचे पैसे ग्राहकांना द्यायला लावायचे, मग पुन्हा तीच इंजेक्शन्स आणि सिरिंज दुकानात नेऊन ठेवायचे. ग्राहकांना ज्यादाचे इंजेक्शन खरेदी करायला सांगायचे. मग उरलेले इंजेक्शन ग्राहकांना परत न करता दुकानात नेऊन विकायचे. हा सगळा प्रकार एमआरआय करणाऱ्यांनी समोर आणला.

‘असा’ उघड झाला घोटाळा

घडलं असं की, आमआरआय करण्यासाठी तीन रुग्ण गेले. त्यावेळी तिघांनाही एक एक इंजेक्शन खरेदी करायला सांगितलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन इंजेक्शन खरेदी केली. पैसेही दिले आणि रुग्णालयात आले. त्यांनी डॉक्टरांकडे इंजेक्शन दिले. मात्र दोन इंजेक्शन न फोडता परत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले. तर एकच इंजेक्शन तीन रुग्णांना देण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांना दोन आरोपींना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

दलालांच्या माध्यमातून हे इंजेक्शने परत खरेदी केले जायचे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची एम्स प्रशासनाने हकालपट्टी करत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र, हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा असल्यानं यावर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.