ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पाच जणांना घेतलं ताब्यात, चौकशी करीत असताना…

CRIME NEWS : अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा ठाणे गुन्हे शाखेने धाड टाकत पर्दाफाश केला आहे. या धाडीत पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पाच जणांना घेतलं ताब्यात, चौकशी करीत असताना...
business parkImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 9:39 AM

निनाद करमरकर, अंबरनाथ : पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस पार्क (business park) या इमारतीत हे बोगस कॉल सेंटर (bogus call center) सुरू होतं. या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 233 नंबरच्या युनिटमध्ये हे बोगस कॉल सेंटर सुरू करण्यात आलं होतं. या कॉल सेंटरमधून परदेशातील नागरिकांना आपण एक्सफिनिटी कंपनीतून बोलत असल्याचं सांगत त्यांना इंटरनेट सेवा ऑफर, तसंच बक्षीसांची आमिषं दाखवली जायची. त्यानंतर त्यांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स (debit card and credit card details) मिळवायचे त्यांच्या बँक खात्यातून पैसे परस्पर काढले जायचे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांनी या कॉल सेंटरवर धाड टाकली. या ठिकाणी परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ॲलेक्स डेव्हिड बासरी, मिल्टन मेल्विन मंतेरो, श्रीकांत जयप्रकाश पवार, आकाश विनोद ठाकूर आणि पंकज रतनसिंह गौड या पाच जणांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.

त्यांच्यावर फसवणुकीसह कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासह इंडियन टेलिग्राफ अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांचा ताबा सध्या गुन्हे शाखेकडेच आहे. त्यांच्या या बोगस कॉल सेंटरमधून किती लोकांची फसवणूक करण्यात आली आहे ? तसंच त्यांनी लाटलेली रक्कम नेमकी किती आहे? या सगळ्या बाबी आता गुन्हे शाखेच्या तपासात समोर येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

तंत्रज्ञानात जसा बदल होत आहे, त्याचपद्धतीने लोकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. कारण चोरीचं इतर प्रमाण अधिक वाढलं. देशात रोज नव्यानं चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी अधिक वाढली आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या पाच जणांची पोलिस कसून चौकशी करणार आहे. पोलिसांनी त्या कॉल सेंटरमधून महत्त्वाच्या अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. चौकशीत आणखी बऱ्याचं गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.