प्रियकराने लग्नाचं आमिष देत छपराहून दिल्लीला बोलावलं, मग मित्रांसोबत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
बिहारमधील (Bihar) छपरा येथे प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर दिल्लीत सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रियकराने आधी तिचे अपहरण करुन तिला दिल्लीला नेले आणि तिथे त्याच्या मित्रांनी मिळून तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती आहे.
छपरा : बिहारमधील (Bihar) छपरा येथे प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर दिल्लीत सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रियकराने आधी तिचे अपहरण करुन तिला दिल्लीला नेले आणि तिथे त्याच्या मित्रांनी मिळून तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती आहे. त्यानंतर मुलगी कशीबशाी छपरा येथे पोहोचली आणि तिने तरैया पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.
तरैया पोलीस स्टेशन हद्दीतील एका इंटर विद्यार्थिनीचे जवळच्याच गावातील राहुल कुमार या तरुणाशी प्रेमसंबंध होते. यानंतर तिचा प्रियकर दिल्लीला गेला. तेथून तो मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थिनीसोबत सतत संपर्कात होता. काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीच्या प्रियकराचा मित्र संजीव शर्मा त्याच्या अन्य तीन मित्रांसह चारचाकी वाहनाने तरैय्या खडरा पुलाजवळ आला. त्यावेळी विद्यार्थिनी इंटरची परीक्षा द्यायला जाणार होती. यादरम्यान, प्रियकराच्या मित्राने त्याचा हात पकडून जबरदस्ती तिला कारमध्ये बसवले.
तरुणीच्या प्रियकराच्या मित्राने सांगितले की, तुझ्या प्रियकराने तुला दिल्लीला बोलावले आहे. त्यानंतर तिला छपरा येथे नेले आणि तेथून दिल्लीला नेले. विद्यार्थिनीला आठ दिवस दिल्लीतच ठेवले होते जिथे तिच्या प्रियकर आणि मित्रांनी अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला.
छपराच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी छपराचे एसपी संतोष कुमार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पीडितेने याप्रकरणी लेखी अर्ज दिला आहे. चौकशीनंतर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच सामूहिक बलात्कारातील सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे एसपी म्हणाले. याप्रकरणी पीडित मुलीने एसपींकडे न्यायाची मागणीही केली आहे.
सायन हॉस्पिटलच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग, 24 वर्षीय तरुणावर गुन्हा https://t.co/dZIKmVn0H2 #Sion | #Molestation | #Crime | #Mumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 9, 2021
संबंधित बातम्या :
औरंगाबादेत हळहळः लग्न तोंडावर, मुलगी पळून गेली, हताश बापाची आत्महत्या, लिहिलं- तिला घरात घेऊ नका…