महिलेचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याचा बनाव, चार वर्षांच्या मुलांनी सांगितलं बाबांनीच आईला ढकललं

छतावरून पडल्याने सोनीचा मृत्यू झाल्याची माहिती आधी गावात पसरली. त्यानंतर सोनीच्या माहेरच्या नातेवाईकांच्या आरोपानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हत्येची घटना त्यांच्या 4 वर्ष आणि 2 वर्षांच्या दोन मुलांसमोर घडल्याचे सांगितले जात आहे.

महिलेचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याचा बनाव, चार वर्षांच्या मुलांनी सांगितलं बाबांनीच आईला ढकललं
बिहारमध्ये महिलेची हत्या पती परागंदा
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 11:35 AM

पाटणा : पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोचस गावात उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे सोनी देवी या विवाहितेची पतीने त्यांच्या दोन लहान मुलांसमोरच हत्या केल्याची माहिती आहे. सुरुवातीला छतावरुन पडून महिलेचा मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. मात्र नंतर तिच्या माहेरच्यांनी पतीवर हत्येचा आरोप केला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीचा खून केल्यानंतर पती गोलू साह हा गावातून फरार झाला आहे. या घटनेविषयी समजताच मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी कोचस गाठले. पोलिसांना माहिती मिळताच महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सासाराम सदर रुग्णालयात पाठवला आहे.

काय आहे प्रकरण?

बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील कुद्रा पोलीस स्टेशन हद्दीतील डुमरी रघुनंदनपूर येथील सरयुग साह यांची कन्या सोनी कुमारी हिचा विवाह करगहरचा रहिवासी गोलू साह याच्यासोबत मे 2017 मध्ये झाला होता. नंतर गोलूने कोचस येथे राहून भंगाराचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. मात्र दररोज छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होत होते. कदाचित याच वादातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोन मुलांसमोर हत्या

छतावरून पडल्याने सोनीचा मृत्यू झाल्याची माहिती आधी गावात पसरली. त्यानंतर सोनीच्या माहेरच्या नातेवाईकांच्या आरोपानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हत्येची घटना त्यांच्या 4 वर्ष आणि 2 वर्षांच्या दोन मुलांसमोर घडल्याचे सांगितले जात आहे.

बहिणीला वारंवार मारहाण, भावाचा आरोप

सोनीचा भाऊ गोलू गुप्ता याने सांगितले की, यापूर्वीही आरोपीकडून आपल्या बहिणीला मारहाण करण्यात आली होती, मात्र यावेळी तिची हत्या करण्यात आली. महिलेचा गळा दाबल्याच्या खुणा असून, मारहाणीचेही वळ दिसत आहेत. त्यावरुन सासरच्या मंडळींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. दारुच्या नशेत पतीने हा खून केल्याचा आरोपही केला जात आहे.

सासारामचे डीएसपी विनोद कुमार रावत या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालयात पाठवला असून आसपासच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र, आरोपींना अटक झालेली नाही.

संबंधित बातम्या :

पोलिसांच्या तावडीतून मालकाने सोडवलं, वॉचमनचा बायकोसोबत त्याच्याच घरी 47 लाखांचा दरोडा

गोड बोलून तरुणाला जाळ्यात अडकवलं, मागितली एक लाखाची खंडणी, औरंगाबादध्ये हनी ट्रॅपची केस!

अमरत्वाचा सोस, पत्नीने पतीला घरामागे जिवंत गाडले, दोन दिवसांनी मुलीला आढळला मृतदेह

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.