पोलीस असल्याचं सांगून प्रेमी युगुलाचे फोटो काढले, नंतर प्रियकरासमोरच प्रेयसीवर बलात्कार

प्रेमी युगुलाचा पाठलाग करणाऱ्या चार नराधमांनी पोलिस असल्याचं खोटं सांगून आधी दोघांचा फोटो काढला आणि नंतर प्रियकराला ओलिस करून प्रेयसीला घाबरवलं. त्यानंतर प्रियकराच्या समोरच प्रेयसीला झुडपात नेऊन एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पोलीस असल्याचं सांगून प्रेमी युगुलाचे फोटो काढले, नंतर प्रियकरासमोरच प्रेयसीवर बलात्कार
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 2:36 PM

पाटणा : प्रेमी युगुलाला एकांतात पाहून काही नराधमांनी आधी प्रियकराला ओलीस ठेवले, नंतर त्याच्यासमोरच प्रेयसीवर बलात्कार केला. बिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे पोलीस असल्याची बतावणी करुन आरोपीने अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे. 13 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकरासह निर्जन ठिकाणी असताना तिच्यावर बलात्काराची ही लाजिरवाणी घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

प्रेमी युगुलाचा पाठलाग करणाऱ्या चार नराधमांनी पोलिस असल्याचं खोटं सांगून आधी दोघांचा फोटो काढला आणि नंतर प्रियकराला ओलिस करून प्रेयसीला घाबरवलं. त्यानंतर प्रियकराच्या समोरच प्रेयसीला झुडपात नेऊन एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

अत्याचार केल्यानंतर गुन्हेगारांनी आपला मोबाईल क्रमांकही दिला. कोणाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही, मी स्वतः पोलिसात आहे, त्यामुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यास जाऊन काही फायदा होणार नाही, अशी भीती आरोपीने जोडप्याला दाखवली.

नेमकं काय घडलं?

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस असल्याचे भासवून चार तरुणांनी त्यांना धमकावले आणि नंतर तिच्या प्रियकराला ओलीस ठेवून बलात्काराची केला. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ती तिच्या प्रियकरासोबत एकांतात बसली होती. यावेळी दोन दुचाकींवरुन चौघे जण तिथे आले.

धमकावून झुडपात अत्याचार

या चार तरुणांनी आधी पीडिता आणि तिच्या प्रियकराचा मोबाईलमध्ये फोटो काढला. नंतर आपण पोलीस असल्याचे सांगून दोघांना धमकवण्यास सुरुवात केली. या चार तरुणांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात नेण्याची धमकी दिली. नंतर त्यांनी पीडितेचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. प्रियकराने विरोध केल्यावर त्यांनी त्याला पकडून ठेवले.

पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

यानंतर एका तरुणाने जवळच्या झाडीत नेऊन बलात्कार केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. मात्र, पीडितेच्या वडिलांनी 4 जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, तर पीडितेने मात्र एकानेच बलात्कार केल्याचा उल्लेख केला आहे. या घटनेवेळी चौघे जण उपस्थित होते, असेही तिचे म्हणणे आहे. पीडितेने असेही सांगितले की, या घटनेनंतर तिला जीव द्यायचा होता, आणि ती घरातून निघून गेली होती. पण, शहापूर भागात एका वाटसरूने तिला घरात आसरा दिला. यानंतर पोलिसांना आणि कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.

पीडितेच्या प्रियकरालाही अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरु करत पीडितेच्या प्रियकरालाही अटक केली. पोलिसांनी 4 गुन्हेगारांपैकी एकाची ओळख पटवली आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरालाही ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपींना शिक्षा व्हावी, अशी पीडितेची इच्छा आहे. फुलवारी शरीफचे एसएचओ रफीकुर रहमान यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी आतापर्यंत कोणत्याही पक्षाने लेखी अर्ज दिलेला नाही, मात्र पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

नात्यांची गुंतागुंत, पोटच्या मुलीशी 57 वर्षीय प्रियकराचं लग्न, मुंबईत सत्तरीच्या महिलेने बॉयफ्रेण्डचा जीव घेतला

मोबाईल घरी ठेवून दरोडा, कोड नंबरने एकमेकांना हाका, दुहेरी हत्या करणारे पाच दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात कसे सापडले?

विवाहबाह्य संबंधातून अल्पवयीन मुलाकडून विवाहितेची हत्या, मृतदेहाचे प्रायव्हेट पार्टही पेटवले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.