रात्र होताच सुनेच्या बेडरुममध्ये जायचा सासरा, अखेर 10 वर्षानंतर सासूने….

काही नाती खूप पवित्र असतात. त्यांचं पावित्र्य जपलं पाहिजे. पण वासनेच्या आहारी गेलेल्या माणसांना त्याचा विसर पडतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

रात्र होताच सुनेच्या बेडरुममध्ये जायचा सासरा, अखेर 10 वर्षानंतर सासूने....
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 12:21 PM

घरातल्या अनैतिक संबंधांना विरोध करणं एका महिलेला चांगलच महाग पडलं. नवऱ्याच्या सूनेसोबतच्या अनैतिक संबंधांना या महिलेचा विरोध होता. पण सून, नवरा आणि मुलगा या तिघांना अशा नात्यावर कुठला आक्षेप नव्हता. उलट तेच महिलेचा पाण उतारा करायचे. जवळच्या माणसांकडून होणाऱ्या या अपमानाला कंटाळून महिला तिच्या मुलीच्या घरी रहायला गेली. अधंन-मधंन ती घरी यायची. एक दिवस ती आपल्या घरी आली होती. त्यावेळी तिने पुन्हा नवरा आणि सुनेच्या अनैतिक संबंधांना विरोध केला. त्यावेळी महिलेला मारहाण झाली. अखेर तिने या त्रासाला कंटाळून जीवन संपवून घेतलं. बिहारच्या जुमईमधील हे प्रकरण आहे.

या घटनेनंतर महिलेचा पती, सून आणि मुलगा तिघे फरार आहेत. झाझा पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या बालियोडीह गावातील हे प्रकरण आहे. बालदेव यादवचे सूनसोबत मागच्या 10 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्याला संपतिया देवीचा विरोध होता. संपतिया देवी पती आणि सूनेमध्ये असलेल्या अनैतिक संबंधांमुळे हैराण झालेली. हे नातं संपवा असं ती सतत सांगायची. पण उलटं व्हायच सून आणि सासरा मिळून तिला मारहाण करायचे.

मुलीने काय म्हटलय?

यावेळी तिला हा धक्का सहन झाला नाही. तिने विष पिऊन जीवन संपवलं. महिलेच्या मुलीने ही हत्या असल्याच सांगितलं. वडिल, भाऊ आणि वहिनीने विष देऊन आपल्या आईला मारलं असं संपतिया देवीच्या मुलीने ललिताने आरोप केला. अनैतिक संबंधांना ती विरोध करायची. म्हणून माझ्या आईला हे सर्व मिळून मारहाण करायचे. तिला भोजन देत नव्हते. मारहाण करुन विष देऊन तिला मारुन टाकलं. त्यानंतर घरातून पसार झाले असा आरोप ललिताने केला.

पोलीस तपासात काय आढळलं?

सूनेसोबत वाद झाल्यानंतर संपत्तिया देवीने विषारी पदार्थ खाऊन जीवन संपवल्याच प्राथमिक तपासात समोर आलय. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. पोस्टमार्टमसाठी मृतदेह जमुई सदर रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस सर्व आरोपींचा शोध घेत आहे असं संजय कुमार सिंह यांनी सांगितलं.

नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा.
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्...
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्....
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?.
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?.
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून...
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून....
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?.
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य.
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका.
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?.