सासऱ्याला सूनेच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं, त्यानंतर दोघांमध्ये शेतात जे घडलं, ते…एखाद्या चित्रपटासारखा शेवट
मंगळवारी तीन वाजता ती मुखराव येथून निघाली. संध्याकाळी सात वाजता सासरा तिला खीरी गाव येथे नेण्यासाठी आला. सासरा तिला नदी किनारी असलेल्या चण्याच्या शेतात घेऊन गेला. या दरम्यान त्याने गुडियासोबत शरीरसंबंध ठेवले.

बिहारच्या कैमूरमध्ये काही दिवसांपूर्वी चण्याच्या शेतात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. हत्येच प्रकरण वाटत होतं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. आता या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. त्या व्यक्तीची हत्या सुनेनेच केली. सुनेने आपला गुन्हा कबूल केला. सूनेने त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले. बधार गावची ही घटना आहे. 50 वर्षीय रामाशीष बिंद हत्या प्रकरणात पोलिसांनी हैराण करणारा खुलासा केलाय. पोलिसांनी मृत व्यक्तीची मोठी सून गुडिया देवीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली. तिला कोर्टात हजर केलं. तिला तिथून भभुआ जेलमध्ये पाठवण्यात आलं. सासरा सूनेवर अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. हेच हत्येच मुख्य कारण ठरलं. अखेर कंटाळून गुडिया देवीने सासऱ्याची हत्या केली.
पोलीस अधिकारी रूबी कुमारी यांनी घटनास्थळी सापडलेल्या रामाशीष बिंदच्या मोबाइल फोनचा कॉल डिटेल मिळवला. तपासात समोर आलं की, सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कॉल केला होता. हाच कॉल गुन्ह्याची उकल करण्यात महत्त्वाचा पुरावा ठरला. पोलीस चौकशीत गुडियाने सांगितलं की, तिचं दुसऱ्या एका मुलासोबत अफेयर सुरु होतं. या बद्दल सासऱ्याला समजलं. त्यानंतर तो सूनेवर त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला. सूनेने विरोध केला. पण तो ऐकत नव्हता. गुडियाने सासू आणि नणदेला सुद्धा या बद्दल सांगितलं. पण ते गुडियालाच चुकीच ठरवत होते. गुडियाचा नवरा बाहेर असायचा.
नदी किनारी असलेल्या चण्याच्या शेतात घेऊन गेला
होळीच्यावेळी गुडिया तिच्या माहेरी गेली. पण सासरा तिला फोन करुन भेटण्यासाठी दबाव टाकत होता. अखेरीस गुडियाने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. प्लाननुसार, मंगळवारी तीन वाजता ती मुखराव येथून निघाली. संध्याकाळी सात वाजता सासरा तिला बक्सर जिल्ह्यातील खीरी गाव येथे नेण्यासाठी आला. सासरा तिला नदी किनारी असलेल्या चण्याच्या शेतात घेऊन गेला. या दरम्यान त्याने गुडियासोबत शरीरसंबंध ठेवले. गुडियाने संधी मिळताच. सासऱ्याची हत्या केली. तिथून ती माहेरी आली. कपडे बदलून दुसऱ्यादिवशी दुपारी मुखरावला पोहोचली. सासऱ्याच्या निधनाच्या दु:खात इतरांसोबत सहभागी झाली. पोलिसांना या हत्याकांडात अन्य लोक सहभागी असल्याचा संशय आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.