Kidnapping | लग्नाच्या काही तास अगोदर वधूचे अपहरण, पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल, वाचा नेमके काय घडले!

लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. नातेवाईकांपासून ते समाजातील सर्व लोक उपस्थित होते, मात्र त्यानंतर त्यांच्या मुलीचे अपहरण झाले. याप्रकरणी फारबिसगंजचे एसडीपीओ रामपुकर सिंह यांनी सांगितले की, ही गोदिहरे येथील घटना आहे. 22 जून रोजी वरात येणार होती. मात्र त्यापूर्वीच गावातील तरुणाने वधूचे अपहरण केले.

Kidnapping | लग्नाच्या काही तास अगोदर वधूचे अपहरण, पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल, वाचा नेमके काय घडले!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 12:10 PM

बिहारमधील (Bihar) फारबिसगंज जिल्ह्यातील गोदीहरे येथे एक विचित्र घटना घडलीयं. वरात दारात येण्यापूर्वीच वधूचे अपहरण करण्यात आले. पहाटे तीन वाजेपर्यंत वराच्या मंडळींनी वधूची वाट पाहिली. ही घटना 22 जूनची आहे. लग्नाच्या काही तास अगोदरच वधूचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले. वधूची आई पिंकी देवी यांनी सांगितले की, त्यांनी मुलीच्या लग्नाची सर्व तयारी केली, लग्नाची वरात येणार होती. खूप आनंदामध्ये सर्वकाही सुरू होते. पण तेवढ्यात गावातील एका तरुणाने आपल्या मुलीला आमिष (Bait) दाखवून पळवून नेले.

नातेवाईकांकडून पैसे घेत मुलीच्या लग्नाची तयारी

मुलीच्या आईने सांगितले की, काही लोकांनी तिच्या मुलीला चहा प्यायला लावला. त्यानंतर तिचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी 24 तासांत मुलगी परत करू, असे सांगितले होते. आम्ही वाट पाहत राहिलो, पण तसे झाले नाही. नवरदेवाकडील पहाटे तीन वाजेपर्यंत वधूची वाट पाहत होते, मात्र त्यानंतर ते निघून गेले. मुलीचे वडील संजय पासवान यांनी सांगितले की, मुलीच्या लग्नासाठी त्यांनी मोठी तयारी केली होती. इकतेच नाही तर आपल्या मुलीच्या लग्नात काही कमी पडू नये, म्हणून नातेवाईकांकडून देखील पैसे घेतले होते.

हे सुद्धा वाचा

फारबिसगंजचे एसडीपीओ रामपुकर सिंह यांनी सांगितले की…

लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. नातेवाईकांपासून ते समाजातील सर्व लोक उपस्थित होते, मात्र त्यानंतर त्यांच्या मुलीचे अपहरण झाले. याप्रकरणी फारबिसगंजचे एसडीपीओ रामपुकर सिंह यांनी सांगितले की, ही गोदिहरे येथील घटना आहे. 22 जून रोजी वरात येणार होती. मात्र त्यापूर्वीच गावातील तरुणाने वधूचे अपहरण केले. गावातील सौनू कुमारवर मुलीला पळवून नेल्याचा आरोप आहे. त्याचे वडील दारूचा व्यवसाय करतात. पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून पोलिस कारवाई करत आहेत. यासंदर्भात आजतकने दिला सविस्तर रिपोर्ट.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.