आईचे विवाहबाह्य संबंध मुलाच्या जीवावर, प्रियकराकडून बालकाची हत्या

ज्या तरुणासोबत महिलेचे विवाहबाह्य संबंध होते, त्यानेच तिच्या दहा वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर बालकाचा मृतदेह कालव्याच्या किनाऱ्यावर फेकला

आईचे विवाहबाह्य संबंध मुलाच्या जीवावर, प्रियकराकडून बालकाची हत्या
अल्पवयीन बालकाची हत्या
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 9:15 AM

पाटणा : आईचे विवाहबाह्य संबंध मुलाच्या जीवावर उठल्याची घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमधून समोर आली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या बालकाची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक केली आहे. दहा वर्षांच्या नीरज चौधरीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. (Bihar Mother Extra Marital affair Boyfriend kills her child)

बालकाचा मृतदेह कालव्याच्या किनाऱ्यावर

बिहारमधील मुझफ्फरपूरच्या बरुराज भागातील हरनाही गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. ज्या तरुणासोबत महिलेचे विवाहबाह्य संबंध होते, त्यानेच तिच्या दहा वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर बालकाचा मृतदेह कालव्याच्या किनाऱ्यावर फेकला. शनिवारी सकाळी स्थानिक रहिवाशांना चिमुरड्याचा मृतदेह दिसला, त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नीरजच्या मृतदेहाची त्याच्या कुटुंबीयांनी ओळख पटवली.

चिमुरडा वरातीत गेल्याचा समज

नीरजचे पिता नरेश चौधरी यांनी सांगितलं, की “शुक्रवारी रात्री आठ वाजता घरातील सर्व जण झोपायला गेले. त्यावेळी नीरज घरी नव्हता. शुक्रवारी रात्री गावात तीन वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाची वरात आली होती. त्यामुळे तो वरात बघायला गेला असावा, असा कुटुंबीयांचा समज झाला होता. मात्र बराच वेळ तो परत न आल्यामुळे शोधाशोध सुरु झाली, परंतु तो कुठेच सापडला नाही. अखेर शनिवारी सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली”

नीरज चौधरीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुटुंबीयांच्या माहितीवरुन एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी सुरु आहे. नीरजच्या आईचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे तिच्या प्रियकरानेच मुलाची हत्या केल्याचं बोललं जात आहे. पोलिस प्रत्येक पैलूवर तपास करत आहेत.

मामी-चुलत मामाच्या संबंधांमुळे भाच्याचा जीव गेला

दरम्यान, मामी आणि चुलत मामाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने दहा वर्षांच्या भाच्याला जीव गमवावा लागल्याची घटना गेल्या वर्षी उघडकीस आली होती. विवाहबाह्य संबंध उघड होण्याच्या भीतीने मामीने बालकाची निर्घृण हत्या केली होती. दहा वर्षांचा चिमुकला आपल्या आजीच्या घरी राहायला आला होता. तिथे त्याने आपल्या मामीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. तिचा प्रियकर म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नाही, तिच्या पतीचा चुलतभाऊ होता.

भाचा आपल्या संबंधांविषयी आपला पती आणि इतर नातेवाईकांना सांगेल, अशी भीती मामीला सतावत होती. मामी आणि तिच्या चुलत दीराचे जवळपास दहा वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. मात्र आपले संबंध उघड होण्याची धास्ती मामीला वाटत होती. त्यामुळे दोघांनी भाच्याचा काटा कायमस्वरुपी काढण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या :

मामी आणि चुलत मामाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, दहा वर्षांच्या भाच्याची हत्या

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादराल

(Bihar Mother Extra Marital affair Boyfriend kills her child)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.