‘प्रेग्नेंट करा, 5 लाख कमवा..’, या अनोख्या नोकरीसाठी धडाधड उड्या पडल्या पण पुढे जे घडलं ते…
निसंतान महिलांना प्रेग्नेंट करा आणि पाच लाख रुपये मिळवा अशी जाहीरात आली. अनेकांनी स्वत:हून या नोकरीसाठी अर्ज केला. पण पुढे आपल्यासोबत काय घडणार? याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. अनेकांनी पैशाच्या स्वार्थापोटी नोकरीला होकार दिला.
निसंतान महिलांना प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये कमवा….अशा जाहीराती मागच्या काही दिवसात बिहारच्या नवादामध्ये दिसल्या होत्या. अनेकांनी जाहीरातीच्या खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला. त्यावेळी समोरुन सांगण्यात आलं की, तुम्हाला निसंतान महिलांना प्रेग्नेंट करायचं आहे. महिला प्रेग्नेंट राहिल्या तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील. महिला गर्भवती राहिल्या नाहीत, तर तुम्हाला 50 हजार रुपये जरुर मिळतील.
अनेकांनी पैशाच्या स्वार्थापोटी नोकरीला होकार दिला. पण त्यांना हे माहित नव्हतं की, पुढे त्यांच्यासोबत काय होणार आहे. जाहीरात देणाऱ्यांनी रजिस्ट्रेशनच्या नावाखाली शुल्क आकारण्यास सुरुवात केली. पण जसे ते फी द्यायचे, तसे जाहीरात देणारे त्यांचा नंबर ब्लॉक करायचे. जेव्हा ही सारी प्रकरणं पोलिसांसमोर आली, त्यावेळी त्यांनी तपास सुरु केला. लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणारी टोळी कोण, ते त्यांनी शोधून काढलं आहे.
प्ले बॉय सर्विसच्या नावावर कॉल
नवादा पोलिसांनी नारदीगंज येथील कहुआरा गावात छापेमारी करुन तीन सायबर गुन्हेगारांना अटक केलीय. हे आरोपी साइबर ठग ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब (बेबी बर्थ सर्विस), प्ले बॉय सर्विसच्या नावावर लोकांना कॉल करुन त्यांची फसवणूक करत होते. आतापर्यंत त्यांनी एकूण किती लोकांना फसवलय त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
लोक स्वत: कॉन्टॅक्ट करायचे
हे सायबर ठग देशाच्या वेगवेगळ्या राज्यात फोन कॉल करायचे आणि फोन उचलल्यानंतर समोरच्याला, मूल-बाळ नसलेल्या महिलांना गर्भवती करायचं आहे, असं सांगायचे. या कामासाठी 5 लाख रुपये मिळतील असं आमिष दाखवायचे. मुल झालं नाही, तरी 50 हजार मिळतील असं सांगायचे. जेव्हा समोरचा व्यक्ती तयार व्हायचा तेव्हा ठग रजिस्ट्रेशन फी च्या नावाखाली 500 ते 20 हजार रुपये ऑनलाइन पेमेंट घ्यायचा. अनेक ठिकाणी जाहीराती पाहून लोक स्वत: कॉन्टॅक्ट करायचे.
हे आरोपी कोण?
या सायबर गुन्हेगारांकडून पोलिसांनी सहा मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. मोबाइल फोनच्या तपासात व्हाट्सएप फोटो, ऑडियो आणि व्यवहाराचे ट्रॅजेक्शन मिळाले आहेत. राहुल कुमार (19), भोला कुमार (20) आणि प्रिंस राज उर्फ पंकज कुमार (20) अशी सर्व आरोपींची नाव आहेत. सर्व आरोपी कहुआरा गावचे निवासी आहेत.