पतीच्या नावे कर्ज काढून त्याचीच सुपारी, बॉयफ्रेण्ड म्हणाला नवरा मेल्यावर कर्जमाफी मिळेल

बिहारमध्ये राहणाऱ्या ट्रकचालकाची 20 जूनच्या रात्री हत्या झाली होती. धर्मेंद्र रविदास आपल्या घरात झोपला असतानाच घरात घुसून गोळी झाडून त्याची हत्या केल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं होतं.

पतीच्या नावे कर्ज काढून त्याचीच सुपारी, बॉयफ्रेण्ड म्हणाला नवरा मेल्यावर कर्जमाफी मिळेल
विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 3:30 PM

पाटणा : विवाहबाह्य संबंधातून पत्नीने पतीच्याच हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या नावे कर्ज काढून पत्नीने त्याचीच सुपारी दिली. विशेष म्हणजे महिलेच्या बॉयफ्रेण्डनेच तिला तसं करण्याची सूचना दिली होती. नवरा मेल्यावर तुला कर्जमाफी मिळेल, असंही त्याने सांगितल्याचं समोर आलं आहे. बिहारमधील कटिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (Bihar wife plots murder of husband after extra marital affair with boyfriend)

घरात घुसून गोळी झाडून ट्रकचालकाची हत्या

कटिहारमधील डेहरिया गावात राहणाऱ्या ट्रकचालकाची 20 जूनच्या रात्री हत्या झाली होती. धर्मेंद्र रविदास आपल्या घरात झोपला असतानाच घरात घुसून गोळी झाडून त्याची हत्या केल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं होतं. पोलिसांना तपासादरम्यान धर्मेंद्रच्या पत्नीवरच संशयाची सुई फिरत होती. पुढे पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांचा संशय खात्रीत जमा झाला.

नवऱ्याच्या नावाने 90 हजार रुपयांचे कर्ज

धर्मेंद्र रविदास यांची पत्नी संजुलाचे गेल्या सहा महिन्यांपासून राजू कुमार याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. एक महिन्यापूर्वी राजू आणि संजुलाने धर्मेंद्रच्या हत्येचा कट रचला. संजुलाने बँकेतून नवऱ्याच्या नावाने 90 हजार रुपयांचे कर्ज घेतले. पतीच्या निधनानंतर हे कर्ज माफ होईल, असं राजूने तिला सांगितलं. कर्जमाफी आणि विवाहबाह्य संबंधांच्या हव्यासातून तिने पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

सुपारी देऊन पती धर्मेंद्रची हत्या

प्रियकराच्या सांगण्यावरुन संजुलाने 50 हजार रुपयांची सुपारी देऊन पूर्णियातून काँट्रॅक्ट किलर्सना बोलावलं. त्यांना 18 हजार रुपयांचा अॅडव्हान्स दिला. पती झोपल्याची सूचना संजुलाने दिल्यानंतर सुपारी किलर त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोळी झाडून धर्मेंद्रची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक करुन बंदूक आणि काडतुसं, बाईक जप्त केलं आहे.

संबंधित बातम्या :

विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल

पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक

(Bihar wife plots murder of husband after extra marital affair with boyfriend)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.