बंगालमध्ये जीव इतका स्वस्त, भाजपा नेत्यावर हल्ल्याचा थरकाप उडवणारा 25 सेकंदाचा हा VIDEO
"ते गाडीने येत होते. गाडी येताच बॉम्ब टाकण्यात आला. गाडी थांबली नाही, तेव्हा गोळी चालवली. ड्रायव्हरच्या डोक्यावर गोळी लागली. गोळी लागल्यानंतर ड्रायव्हर खाली पडला"
कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ज्यूनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेने बंगालमध्ये वादळ आणलय. ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन, आंदोलन सुरु आहेत. ममता बॅनर्जी सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी नबन्ना येथे आंदोलन केलं. पोलिसांनी यावेळी आंदोलकांवर बलप्रयोग केला. त्या विरोधात भाजपाने आज 12 तासांच बंगाल बंद पुकारला आहे. याचवेळी भाजपाच्या एका स्थानिक नेत्यावर हल्ला झाला.
या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक अज्ज्ञात आरोपीने स्थानिक भाजपा नेता प्रियांगु पांडे यांच्या गाडीवर गोळीबार केला. हल्लेखोराने पांडे यांच्या कारवर सहा राऊंड फायर केल्या. या फायरिंगमध्ये कारची काच फुटून ड्रायव्हरला गोळी लागली. प्रियांगु सुद्धा या हल्ल्यात जखमी झाले.
TMC goon opening fire on eminent BJP Leader Priyangu Pandey’s vehicle at Bhatpara. The driver of the vehicle is shot. This is how Mamata Banerjee & TMC are trying to force BJP off the street. The Bandh is successful and people have supported it wholeheartedly. The toxic cocktail… pic.twitter.com/mOGsLnk9jh
— Suvendu Adhikari (@SuvenduWB) August 28, 2024
या हल्ल्यानंतर भाजपा नेते शुभेंदु अधिकारी म्हणाले की, “टीएमसीच्या गुंडाने भाजपा नेत्याच्या वाहनावर गोळीबार केला. ड्रायव्हरला गोळी लागली. या प्रकारे ममता बॅनर्जी आणि टीएमसी भाजपाला रस्त्यावरुन हटवण्याचा प्रयत्न करत आहे. बंद यशस्वी ठरला. लोकांनी याच मनापासून स्वागत केलं. पोलीस आणि टीएमसीच टॉक्सिक कॉकटेल आता भाजपाला घाबरवू शकत नाही”
West Bengal | Two people got injured in the attack and firing incident on the BJP leader Priyangu Pandey’s car, earlier today, in Bhatpara of North 24 Parganas pic.twitter.com/MO2x3vxabB
— ANI (@ANI) August 28, 2024
“प्रियांगु पांडे आमच्या पक्षाचे नेते आहेत. ते गाडीने येत होते. गाडी येताच बॉम्ब टाकण्यात आला. गाडी थांबली नाही, तेव्हा गोळी चालवली. ड्रायव्हरच्या डोक्यावर गोळी लागली. गोळी लागल्यानंतर ड्रायव्हर खाली पडला. एसपीच्या उपस्थितीत हे सर्व झालं. अनेक गोळ्या झाडल्या” असं बंगाल भाजपाचे नेते अर्जुन सिंह म्हणाले.