Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना मोठा झटका, हायकोर्टानेही अटकपूर्व जामीन फेटाळला
नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारत हायकोर्टाने त्यांना मोठा झटका दिला आहे. साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी नितेश राणेंना घालण्यात आल्या आहेत.
मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी (Santosh Parab Attack Case) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला. जवळपास दोन आठवड्यांच्या अज्ञातवासानंतर दोनच दिवसांपूर्वी नितेश राणे माध्यमांसमोर आले होते. त्यानंतर आता कोर्टाने त्यांना धक्का दिला आहे. नितेश राणे हे संतोष परब यांच्यावरील हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचा आणि हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारत त्यांना मोठा झटका दिला आहे. साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी नितेश राणेंना घालण्यात आल्या आहेत.
मारहाणीचा आरोप
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारावेळी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. त्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर, नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेतली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली, त्याच्या स्वागताच्या निमित्ताने नितेश राणे माध्यमांसमोर आले होते.
नारायण राणेंच्या वक्तव्याने वाद
काही दिवसांपूर्वीच कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजवल्याने राज्यातले राजकारण तापले होते, नितेश राणे यांचा पोलीस शोध घेत होते, त्यावेळी नारायण राणे यांची पत्रकार परिषद सुरू असता नितेश राणे कुठे आहेत? असे विचारल्यावर, सांगायला मुर्ख आहे का? असे उत्तर दिल्याने बराच वाद पेटला होता.
नितेश राणे-शिवसेना वादाचा ताजा घटनाक्रम
संबंधित बातम्या :
नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, राणेंना जेल की बेल?
अखेर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर आले, परंतु 15 दिवस कुठे होते?
राणेंसोबतच्या बैठकीनंतर नाराजीवर राजन तेली यांची पहिली प्रतिक्रिया…तेली म्हणाले…