बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यवसायिकाचं अपहरण, जीवे मारण्याचाही प्रयत्न, भाजपच्या ZP सदस्यावर गंभीर आरोप

सांगलीत एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे भिलवडीचे भाजपचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह आणखी दोघांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत (BJP zilla parishad member accused of kidnapping builder and trying to kill in Sangli)

बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यवसायिकाचं अपहरण, जीवे मारण्याचाही प्रयत्न, भाजपच्या ZP सदस्यावर गंभीर आरोप
सांगली जिल्हा परिषदेचे भिलवडीचे भाजपचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 9:55 PM

सांगली : सांगलीत एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे भिलवडीचे भाजपचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह आणखी दोघांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. भाजपचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी सांगलीचे बांधकाम व्यावसायिक राहुल तावदर यांचं आधी अपहरण केलं. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी नेमकं खरं-खोटं काय, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मात्र, या प्रकरणाची सध्या संपूर्ण सांगलीत चर्चा सुरु आहे (BJP zilla parishad member accused of kidnapping builder and trying to kill in Sangli).

फिर्यादीत वाळवेकर यांच्यावर गंभीर आरोप

बांधकाम व्यावसायिक राहुल तावदर यांच्या वडिलांनी भाजपचे सुरेंद्र वाळवेकर यांच्याकडून चार वर्षांपूर्वी जमिनीच्या व्यवहारासाठी 15 लाखांचे कर्ज घेतलं होतं. त्यांनी ते पैसे परत केले होते. मात्र वाळवेकर यांच्याकडून व्याजासाठी तगादा लावण्यात आला होता. त्यांचा दोन महिन्यांपासून हा तगादा सुरू होता. त्यातून शनिवारी (5 मे) सांगलीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी सुरेंद्र वाळवेकर यांनी राहुल तावदर यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केलं. तसेच जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला, अशी फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादीनुसार वाळवेकर यांच्यासह आणखी दोघांवर सावकारी, अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाले आहेत (BJP zilla parishad member accused of kidnapping builder and trying to kill in Sangli).

घटनेमुळे परिसरात खळबळ

याप्रकरणी पोलिसांचा सध्या तपास सुरु आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्याची शक्यता आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. काही नागरिक राहुल तावदर यांच्या बाजूने मत मांडत आहेत. सुरेंद्र वाळवेकर इतकी मोठी हिंमत कशी करु शकतात? असा सवाल काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर तावदर कुटुंबियांनी न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पोलिसांचा सध्या तपास सुरु असून ते नक्की या प्रकरणी न्याय देतील, अशी आशा राहुल तावदर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Satara Unlock : साताऱ्यातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, नवे नियम लागू, काय सुरु काय बंद?

रुग्ण दगावला, नातेवाईकांची पोलिसात तक्रार, पाच जणांवर गुन्हे दाखल, डॉक्टरांचं थेट कामबंद आंदोलन

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.