बॉलीवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील ‘या’ आरोपीला परदेशी जाण्याची परवानगी
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात एक्सक्युटिव्ह प्रोड्युसर क्षितिज प्रसाद याला अटक झाली होती. त्याच्या घरात ड्रग्स सापडलं होत. | bollywood drug racket case
मुंबई: बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणातील आरोपी क्षितिज प्रसाद याला विशेष न्यायालयाने परदेशी जाण्याची परवानगी दिली आहे. त्याचा पासपोर्ट ही प्रवासासाठी परत करण्याचे आदेश एनसीबीला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. (bollywood drug racket case kishtij pradad get permission to travel in foreign)
अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात एक्सक्युटिव्ह प्रोड्युसर क्षितिज प्रसाद याला अटक झाली होती. त्याच्या घरात ड्रग्स सापडलं होतं. या प्रकरणात त्याला नंतर जामीन ही मिळाला आहे. जामीन देताना कोर्टाने त्याला काही अटी घातल्या होत्या. यापैकी एक अट पासपोर्ट एनसीबीच्या अधिकाऱ्याकडे जमा करावा, अशी ही अट होती. मात्र, कामा निमित्त क्षितिज याला परदेशी जायचं आहे.परदेशी जाण्यासाठी परवानगी मिळावी आणि पासपोर्ट ही मिळावा या साठी क्षितिज याने कोर्टात अर्ज केला होता. यावेळी क्षितिज याच्यावतीने वकील निखिल मानेशिंदे यांनी युक्तिवाद केला. यानंतर कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे.
न्यायालयाने क्षितिज प्रसादला घातलेल्या अटी खालीलप्रमाणे:
* एनसीबीने क्षितिज प्रसाद याचा पासपोर्ट त्याला प्रवास करण्यापूरता द्यावा आणि तो परदेशातून परत आल्यावर त्याचा पासपोर्ट परत ताब्यात घ्यावा
* अर्जदार क्षितीज प्रसाद हे 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत केनिया येथे जाऊ शकतात.मात्र,त्यासाठी त्यांनी कोर्टात 50 हजार रुपये सेक्युरिटी म्हणून जमा करावेत.
* क्षितिज यांनी परदेशातून परत आल्यावर एक आठवड्याच्या आत आपला पासपोर्ट परत जमा करावा.
* आरोपी क्षितिज याने पासपोर्ट ची डुप्लिकेट प्रत एनसीबी कार्यालयात जमा करावी आणि त्याच्या सोबत त्यांच्या पत्नी यांचा फोन नंबर एनसीबी अधिकाऱ्यांना माहितीसाठी द्यावा.
संबंधित बातम्या:
व्हॉट्सअॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम
Drugs Case LIVE | मी छिछोरेच्या पार्टीला होते, पण ड्रग्ज घेतलं नाही : श्रद्धा कपूर
दीपिका आणि साराचा ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार; चौकशी सुरूच
(bollywood drug racket case kishtij pradad get permission to travel in foreign)